breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

#CoronaVirus: काँग्रेसचे आणखी एक नेते आणि त्यांची पत्नी कोरोना पॉझिटिव्ह, घरीच केलं क्वारंटाइन

नवी दिल्ली: दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते अभिषेक मनु सिंघवी आणि त्यांच्या पत्नीची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. सिंघवी यांना ताप आला होता. त्यानंतर त्यांची टेस्ट करण्यात आली होती. ती पॉझिटिव्ह आली आली आहे. नंतर त्यांच्या पत्नीचीही टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.

त्यांना त्यांच्या घरीच क्वारंटाइन करण्यात आलं आहे. सिंघवी यांच्या घरातल्या इतर सदस्यांचीही आता टेस्ट करण्यात येणार आहे. या आधी काँग्रेसचे नेते संजय झा हे सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह निघाले होते. त्यांनीच ही माहिती ट्विटरवर दिली होती. दिल्लीत आज 3,460 नवे रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या 77,240वर गेली आहे. तर मृत्यूसंख्या 2,492 वर गेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button