breaking-newsक्रिडा
लोपेतेगुई यांची रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून गच्छंती
रेयाल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावरून ज्युलेन लोपेतेगुई यांची गच्छंती करण्यात आली आहे. अवघ्या १३९ दिवसांत त्यांची कारकीर्द संपुष्टात आली. त्यांच्या जागेवर ब-संघाचे प्रशिक्षक सँतियागो सोलारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी झालेल्या सामन्यात पारंपरिक प्रतिस्पर्धी बार्सिलोनाकडून ५-१ असा पराभव पत्करावा लागल्यानंतरच त्यांच्यावर हे संकट कोसळले आहे, या चर्चेला बहर आला होता. दरम्यान, लोपेतेगुई हे शनिवारी रेयाल व्हॅलाडॉलिड संघाशी होणाऱ्या सामन्यापर्यंत संघाच्या प्रशिक्षकपदी राहणार आहेत.