breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यात एकाच दिवशी धारदार शस्त्राने दोघांचे खून

पुणे – लोणावळा शहर शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष राहुल उमेश शेट्टी (वय-३८) यांची जयचंद चौक येथील त्यांच्या कार्यालयाजवळ आज (सोमवार) सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडत तसेच धारदार शस्त्राने वार करत हत्या केली.

सकाळच्या सत्रात अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी भर चौकात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. राहुल शेट्टी यांच्या हत्येने तणावाचे वातावरण आहे. शेट्टी यांच्याबरोबर त्यांचा सहकारी गणेश नायडू याची रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास हनुमान टेकडी येथे अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करत खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. एकाच दिवशी हत्येच्या लागोपाठ दोन घटनांनी लोणावळा पुन्हा एकदा हादरले आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा तपास सुरू केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button