breaking-newsराष्ट्रिय

लोकसभेतल्या खासदारांची संख्या १००० करा- प्रणव मुखर्जीं

महाईन्यूज | नवी दिल्ली

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींनी लोकसभेची सदस्य संख्या जवळपास दुप्पट करण्याचा सल्ला दिलेला आहे. सोमवारी इंडिया फाऊंडेशनद्वारे आयोजित अटल बिहारी वाजपेयी स्मृती व्याख्यान कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभेची सदस्य संख्या 543हून वाढवून एक हजार करायला पाहिजे व तसेच राज्यसभेची सदस्य संख्यासुद्धा वाढवण्याची गरज आहे. देशाची लोकसंख्या आणि वाढत्या आकारामुळे सदस्य संख्या वाढवणं आवश्यक असल्याचंही प्रतिपादन प्रणव मुखर्जींनी केलेलं आहे. 

1977ला लोकसभेची सदस्य संख्या शेवटची बदलण्यात आलेली होती. 1971च्या जनगणनेच्या आधारावर ती सदस्य संख्या ठरवण्यात आलेली होती. त्यावेळी देशाची लोकसंख्या 55 कोटी होती. तेव्हापासून आतापर्यंत देशाची लोकसंख्या दुपटीनं वाढलेली आहे. त्यामुळेच लोकसभा मतदारसंघांच्या पुनर्रचनेचा पुन्हा विचार करायला हवा असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button