breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांना कॉंग्रेसतर्फे अभिवादन

पिंपरी – लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी पर्यावरण विभागातर्फे आदरांजली वाहण्यात आली.

सर्वप्रथम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, माजी नगरसेविका निगार बारस्कर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.  यावेळी पर्यावरणहितार्थ काही कार्यक्रम घेण्यात आले. वृक्षारोपण करण्यात आले. तुळस, एलोवीरा, इन्सुलिन असे नानाप्रकारच्या औषधी वृक्षांचे रोपवाटप करण्यात आले. प्लॅस्टिकपासून पर्यावरणाची होणारी भयंकर हानी टाळण्यासाठी आणि समाजात जागृती आणण्यासाठी कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मोरे, पिंपरी-चिंचवड काँग्रेस पर्यावरण विभागाचे अध्यक्ष अशोक मंगल, मा. नगरसेविका निगारताई बारस्कर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष दिलीपसिंग मोहिते, महासचिव राजन पिल्ले, सचिव आयुष मंगल, सचिव अशोक काळभोर, सचिव उमेश बनसोडे, चिंचवड ब्लॉक काँग्रेसचे संदेश नवले, आबा खराडे, एस. टी. कांबळे, मेहबूब शेख, पिं. चिं.  काँग्रेस पर्यावरण विभागाचे उपाध्यक्ष गुरुदेव वैराळ, सचिव राजेशनायर, उद्योजक बिभीषण क्षिरसागर, नवोदित शिक्षाविद हर्षद ताथेड, श्वेता मंगल, मिताली चक्रवर्ती, नेहा मंगल, जयश्री कनाइके, अक्षांश मंगल, राओसा एर्नाल, सुनील पवार, अमृत बहादुर, गगन भूल, ओव्हाळ बाबा, अनिता मांडवडे, भीमाशंकर सरगुंडी, सुरेश कानिटकर, कांबळे व इतर अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button