breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारणराष्ट्रिय

कोविशिल्ड लसीचे डोस ब्रिटनला पाठण्याची परवानगी द्या, सिरम इन्स्टिट्युटची केंद्राकडे मागणी

नवी दिल्ली |

ब्रिटनला कोविशिल्ड लसींचे ५० लाख डोस देण्याची परवानगी सिरम इन्स्टिट्युटने केंद्र सरकारला केली आहे देशांतर्गत सध्या सुरू असलेल्या डोसच्या पुरवठ्यावर कोणताही परिणाम होणार नाही, अशी खात्री सिरमनं केंद्र सरकारला दिली आहे. तसेच, अ‍ॅस्ट्राझेन्कासोबत झालेल्या करारानुसारच हे डोस ब्रिटनला द्यायचे आहेत, असं देखील सिरमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. ब्रिटनमध्ये फायझर आणि कोविशिल्ड या दोन लशींच्या लसीकरणाला परवानगी देण्यात आली आहे.

क्विंटने बीबीसीच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार सिरम इन्स्टिट्युटकडून लसीचे डोस पुरवण्यात झालेल्या उशिरामुळे ब्रिटनमधला लसीकरणाचा कार्यक्रम एप्रिल महिन्यात सुरू होणार आहे. ब्रिटनने अ‍ॅस्ट्राझेन्कासोबत एकूण १० कोटी लसीच्या डोससाठी करार केला आहे. त्यापैकी १ कोटी डोस हे सिरमकडून येणे अपेक्षित आहे. त्यापैकी ५० लाख डोस आत्ता पुरवण्याची परवानगी सिरमने मागितली आहे. ऑक्सफोर्ड, अ‍ॅस्ट्राझेन्का आणि सिरम यांनी संयुक्तपणे कोविशिल्ड लस विकसित केली असून लसीचं बहुतांश उत्पादन हे पुण्यातील सिरमच्या प्लांटमध्ये सुरू आहे.

…तर ब्रिटनमधल्या लसीकरणाला ब्रेक

दरम्यान, सिरमचे सीईओ अदर पुनावाला यानी टेलिग्राफशी बोलताना हे स्पष्ट केलं आहे की ब्रिटनला केला जाणारा लशींचा पुरवठा हा पूर्णपणे केंद्र सरकारच्या परवानगीवर अवलंबून असणार आहे. सरकारने परवानगी दिली, तर डोसचा पुरवठा केला जाईल. या तिन्ही कंपन्यांमध्ये झालेल्या करारानुसार अ‍ॅस्ट्राझेन्काने ज्या देशांसोबत लस पुरवठ्याचे करार केले आहेत, त्या देशांना सिरमकडून लस पुरवठा केला जाणार आहे. जर ब्रिटनला ही ५० लाख डोसची बॅच पाठवली गेली नाही, तर त्यांना लसीकरण थांबवावं लागेल, अशी परिस्थितीत असल्याची माहिती सिरममधील डीजीआरए प्रकाश कुमार सिंग यांनी दिली आहे. त्यामुळे आता यावर केंद्र सरकारकडून काय निर्णय घेतला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

वाचा- जेजुरीत वेश्या व्यवसायावर पोलिसांचा छापा; दोन पीडित मुलींची सुटका

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button