breaking-newsराष्ट्रिय

अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजन लांबणीवर

नवी दिल्ली : अयोध्येतील राम मंदिर भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टने भूमीपूजन आणि निर्माण कार्याला तात्पुरती स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे.

2 जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येतील राम मंदिराचे भूमीपूजन करणार होते. दिल्लीतून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मोदी भूमीपूजन करणार होते. आता अनिश्चित काळासाठी भूमीपूजन लांबणीवर पडले आहे.

सीमेवर भारत-चीनमध्ये तणाव वाढत आहे. चीनने भारताच्या सीमारेषेवर घुसखोरी केली आणि संघर्षात 20 भारतीय जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्ट भूमीपूजनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

अयोध्येतली माती 2 जून रोजीच दिल्लीला आणण्यात आली होती. भाजपचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी पंतप्रधान कार्यालयाकडे ही माती स्वाधीन केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button