breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लिपिक पदावर बोगस भरती ; कारवाईसाठी आयुक्तांच्या हाताला लकवा !

– टंकलेखनाचा अहवाल सहाय्यक आयुक्तांनी दडविला ?

विकास शिंदे

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेत चर्तुर्थ श्रेणी वर्गातून लिपिक पदावर पदोन्नती मिळविलेल्या कर्मचा-यांनी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केले आहे, त्यामुळे 117 कर्मचा-यांच्या टंकलेखन प्रमाणपत्रावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या प्रमाणपत्राची राज्य तंत्रशिक्षण परीक्षा मंडळाकडून खातरजमा करुन आलेला अहवाल प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी दडविला असून दोषी आढळणा-यावर कारवाईस आयुक्तांच्या हाताल लकवा झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु झाली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विभागातील कर्मचा-यांची अपुरी संख्या, शासन दरबारी लालफितीत अडकलेल्या आकृतीबंधामुळे प्रशासनाला कर्मचा-यांची कमरतता जाणवत होती. त्यामुळे प्रशासनाने मंजूर पदावर चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेनूसार लिपिक पदावर पदोन्नती दिली.

महापालिका आस्थापनेवरील वर्ग 4 मधील सुमारे 117 कर्मचा-यांना वर्ग 3 मधील लिपिक पदावर पदोन्नती देण्याचा निर्णय प्रशासनाने दोन महिन्यापुर्वी घेतला. त्याचा लाभ सुमारे 117 कर्मचा-यांना झाला. त्याच्या शैक्षणिक अर्हतेनूसार पदोन्नती देण्यात आली. परंतू, त्यातील काही कर्मचा-यांनी पदोन्नती मिळविण्यासाठी टंकलेखनाचे बोगस प्रमाणपत्र सादर केल्याची बाब निर्दशनास आली. बोगस प्रमाणपत्र सादर त्या कर्मचा-यांनी ही पदोन्नती मिळविल्याची तक्रार आयुक्तांकडे प्राप्त झाली. त्यामुळे सर्वच कर्मचा-याचे प्रमाणपत्रे हे महाराष्ट्र राज्य परीक्षा तंत्रशिक्षण परिषदेकडून खातरजमा घेण्यासाठी पाठविली होती.

दरम्यान, त्या कर्मचा-यांचा अहवाल पालिका प्रशासनास प्राप्त होवून तब्बल पंधरा दिवस उलटले आहेत. त्या कर्मचा-याचा अहवाल प्रशासनातील सहाय्यक आयुक्तांनी दडविला असून त्याची माहिती देण्यास नकार दिला जात आहे. संबंधित कर्मचा-यांना वरिष्ठांचे पाठबळ व आर्शिवाद असल्याचे बोलले जात आहे. तसेच त्या कर्मचा-यांना वाचविण्यासाठी पालिका प्रशासनाची जोरदार तयारी सुरु आहे. याशिवाय त्या बोगस लिपिकांवर कारवाई करण्यास आयुक्तांच्याही हाताला लकवा झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरु आहे.

 

महापालिकेत लिपिक पदावर पदोन्नती मिळविण्यासाठी अनेक कर्मचा-यानी बोगस टंकलेखन प्रमाणपत्र प्रशासनाला सादर केले. त्यात काही कर्मचारी दोषी आढळले आहेत. त्या कर्मचा-यांना टंकलेखन प्रमाणपत्र अवघ्या 20 हजार रुपयात मिळाले आहे. तर काही कर्मचा-यांनी कारवाईच्या भितीने लिपिक पदाची पदोन्नती रद्द करावी, याकरिता प्रशासनात अर्ज दिलेले आहेत. त्यामुळे पालिकेतील पदोन्नती दिलेल्या कर्मचा-याच्या टंकलेखन प्रमाणपत्र बोगस आढळणा-या दोषीवर कडक कारवाई करा.अशी मागणी वसंत रेगडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button