breaking-newsआंतरराष्टीय

नासाच्या मंगळ मोहीमेचे काऊंटडाऊन सुरू

टम्पा – मंगळ ग्रहाच्या पृष्टभागावर यान उतरवण्याची तयारी अमेरिकेने केली असून या यानाच्या प्रक्षेपणाचे काऊंटडाऊन आज पासून सुरू झाले आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेची ही महत्वाकांक्षी योजना आहे. कॅलिफोर्नियाच्या एअर फोर्स तळावरून या यानाचे पॅसिफिक प्रमाण वेळेनुसार उद्या पहाटे चार वाजून 5 मिनीटांनी उड्डाण होणार आहे. या भागात पसरलेल्या ढगाळ हवामानाची एक तांत्रिक अडचण सोडली तर बाकीची कोणतीही तांत्रिक अडचण यात नाही असे नासाच्या सूत्रांनी म्हटले आहे.

अमेरिकेचा हा प्रकल्प एकूण 993 दशलक्ष डॉलर्स खर्चाचा आहे. मंगळ यानाविषयी मनुष्याला खूप कुतुहल आहे. तेथील वातावरण आणि एकूणच स्थितीची माहिती मिळवण्यासाठी हे यान थेट मंगळाच्या पृष्ठभागावर उतरवण्याची जय्यत तयारी नासाने केली आहे. तेथून मिळणाऱ्या माहितीमुळे अनेक भौगोलिक प्रश्‍नांची उत्तरे मिळू शकतील असा विश्‍वास नासाच्या तज्ज्ञांना वाटत आहे. सर्व बाबी यशस्वीपणे पार पडल्या तर हे यान येत्या 26 नोव्हेंबर रोजी मंगळ ग्रहावर उतरेल असे त्यांनी सांगितले.

ईन साईट असे या यानाचे नाव आहे. नासाचे प्रमुख वैज्ञानिक जीम ग्रीन यांनी सांगितले की मंगळ ग्रहावर सतत भूकंप आणि उल्कापात होत असतात. त्याचे कारणही या मोहीमेतून जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. रोबोटिक मशीन यानाच्या बाहेर पडून तेथील वातावरणाची माहिती पृथ्वीवर पाठवेल. तसेच तेथील उष्णतेच्या झोताची माहिती मिळवण्यासाठीही विशेष यंत्रणा यानात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button