breaking-newsमहाराष्ट्र

लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी महिला कॉन्स्टेबलने मागितली परवानगी

बीड जिल्ह्यातील पोलीस शिपाई ललिता साळवे यांच्यानंतर आता अजून एका महिला कॉन्स्टेबलने लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी मागितली आहे. ललिता साळवे यांना लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी परवानगी देण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर ललित साळवे म्हणून त्यांनी पदभार स्विकारला होता. यानंतर ललिता साळवेची ओळख ‘ललित’ अशी झाली. ललिता साळवे यांच्याप्रमाणे रेल्वे सुरक्षा विशेष दलाच्या (RPSF) महिला कॉन्स्टेबलनेही अशीच परवानगी मागितली आहे.

महिला कॉन्स्टेबलकडून मिळालेल्या विनंती अर्जानंतर, आरपीफच्या महासंचालकांनी महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी साळवेंना परवानगी देण्यात आलेल्या ऑर्डरची प्रत मागवली आहे. तसंच कोणत्या नियमांखाली लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी देण्यात आली होती याबद्दलही विचारणा केली आहे.

जर या महिला कॉन्स्टेबलला परवानगी मिळली तर हे देशातील तिसरं प्रकरण असेल ज्यामध्ये लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर महिला कॉन्स्टेबल पुन्हा खात्यात रुजू होईल. आरपीएसएफ हा आरपीएफचा महत्त्वाचा भाग असून २०१५ पासून महिलांची तुकडी सुरु करण्यात आली. विनंती करणारी महिला कॉन्स्टेबल पहिल्या बॅचमधील आहे.

नम्रता सिंहने (बदललेलं नाव) इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, ‘वैद्यकीय तपासणीदरम्यान डॉक्टरांनी माझ्यामध्ये पुरुष लक्षणं असल्याचं सांगितलं. कायद्याने मला लिंगबदल शस्त्रक्रियेची परवानगी आहे. त्यामुळेच मी जैल महिन्यात माझ्या वरिष्ठांकडे परवानगी मागितली आहे. यासोबतच मला पुरुष कॉन्स्टेबल म्हणून पुन्हा सेवेत घेतलं जावं अशीही विनंती केली आहे’. सध्या नम्रता दिल्लीमधील आरपीएफमध्ये कार्यरत आहे.

‘माझे वरिष्ठ नेहमीच सहकार्य करतात. त्यांच्याकडून मला सकारात्मक उत्तर मिळेल असा विश्वास आहे’, असं तिने सांगितलं आहे. यासोबत शस्त्रक्रियेनंतर पुरुषांना द्यावी लागणारी फिटनेस टेस्ट देण्यास आपण तयार असल्याचंही तिने सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button