breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामस्थांच्या आंदोलनाला यश! म्हसवड यात्रेला सशर्त परवानगी

सातारा – म्हसवड येथील सिद्धनाथाच्या यात्रेला सशर्त परवानगी मिळाली आहे. यात्रेत 2 तास मैदानात रथ फिरवण्याची मुभाही दिली आहे. मात्र या यात्रेत बाहेरच्या लोकांना सहभागी होता येणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर ग्रामस्थांनी सुरु केलेले आंदोलन मागे घेतले आहे. म्हसवडची यात्रा आणि रथ फिरवण्यास परवानगी देण्यासाठी येथील ग्रामस्थांनी आंदोलन सुरू केले होते. त्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाने यात्रेला आणि मैदानात रथ फिरवण्यासाठी सशर्त परवानगी दिली आहे. त्यानुसार मंदिराच्या मैदानात 2 तास रथ फिरणार आहे. मात्र या यात्रेत बाहेरील गावच्या लोकांना सहभागी होता येणार नाही. प्रशासनाच्या या परवानगीनंतर ग्रामस्थांनी सुरू केलेले आंदोलन आणि दुकाने बंद ठेवण्याचा दिलेला इशारा मागे घेतला आहे. यामुळे ठरवून दिलेल्या नियमानुसार ही यात्रा होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button