breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

लिंगबदलासाठी कुटुंबीयांनी परवानगी न दिल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

चेन्नई : कुटुंबीयांनी लिंगबदलासाठी परवानगी न दिल्याने नाराज झालेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चेन्नईत सोमवारी ही घटना घडली.22 वर्षीय विद्यार्थिनी फातिमा रेहानाने तिरुवनंतपुरममधील हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरुन उडी मारुन आयुष्य संपवले.

फातिमाला लिंगबदल करुन पुरुष व्हायचे होते, पण कुटुंबीयांनी तिला परवानगी दिली नाही, असे सांगितले जात आहे. फातिमा केरळ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लासमध्ये शिकत होती. पनविलामधील मुस्लीम असोसिएशनच्या महिला होस्टेलमध्ये फातिमा राहत होती. तर तिचे आई-वडील अब्दुल रहमान आणि राफिया परदेशात राहतात. फातिमाचा भाऊदेखील परदेशात असून तिची छोटी बहिण तिरुवनंतपुरममध्ये शिक्षण घेत आहे.

कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनचे निरीक्षक एम प्रसाद यांनी सांगितले की, “कुटुंबीयांनी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेला परवानगी न दिल्याने फातिमाने हे टोकाचे पाऊल उचलले. याआधी लिंगबदलाच्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती मिळवण्यासाठी फातिमा एका डॉक्टरकडे गेली होती. पण कुटुंबीयांच्या परवानगीशिवाय ही शस्त्रक्रिया करता येणार नाही, असे डॉक्टरने तिला सांगितले. यासाठी तिने अनेकदा आई-वडिलांची समजूत घालण्याचाही प्रयत्न केला.” “फातिमाला मुलांसारखे राहायला आणि त्यांच्यासारखेच कपडे घालायला आवडत होते,” असे हॉस्टेल प्रशासनानेही सांगितले. “तर फातिमा सोमवारी हॉस्टेल इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तिथून उडी मारली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता,” अशी माहिती पोलिसांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button