breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

लिंगण्यावरुन कोसळून पुण्यातील गिर्यारोहकाचा मृत्यू

पुणे – लिंगाणा गड उतरताना पाय घसरून एक तरुण मृत्युमुखी पडला. दीपक रोकडे असे त्याचे नाव असून तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करायचा. त्याच्या मागे पत्नी, वडील व चार बहिणी असा परिवार आहे. 

पुणे : लिंगाणा गड उतरताना पाय घसरून एक तरुण मृत्युमुखी पडला. दीपक रोकडे असे त्याचे नाव असून तो पुण्यातील आयटी कंपनीत नोकरी करायचा. त्याच्या मागे पत्नी, वडील व चार बहिणी असा परिवार आहे.

एव्हरेस्टवीर भगवान चवले याने हा ट्रेक नेला होता. त्याने सांगितले की, सुमारे 60 जणांचा ग्रुप होता. बोराट्याची नाळ उतरताना दीपक खाली पाहत होता. त्याच्या मागे-पुढे ट्रेकर्स होते. तो 10-12 फूटच खाली पडला, पण थेट डोक्‍यावर पडल्यामुळे गंभीर दुखापत झाली. त्याने सुमारे 200 किल्ले पाहिले होते. तो नवशिका नव्हता.

मूळचा विदर्भाचा असलेल्या दिपकचा मृतदेह वर काढून आधी मोहरी येथे आणण्यात आला. त्यानंतर भगवान व त्याचे सहकारी पुण्याला रवाना झाले असून ते ससून रुग्णालयात शवविच्छेदन होईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button