breaking-newsमनोरंजन

लाडक्या लेकांसोबत रितेशचा ‘बाला’ डान्स एकदा पाहाच(Video)

दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेला ‘हाऊसफुल ४’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजत आहे. आतापर्यंत या चित्रपटाने बक्कळ कमाई केली असून आठ दिवस उलटल्यानंतरही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही. त्यातच या चित्रपटातील गाणीही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. या चित्रपटातील ‘बाला’ या गाण्याने तरुणाईला वेड लावलं असून अभिनेता रितेश देशमुखही या गाण्याच्या प्रेमात पडला आहे. रितेशने त्याच्या मुलांसोबत बाला या गाण्यावर डान्स केला असून सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

‘हाऊसफुल ४’ या चित्रपटातील ‘बाला’ हे गाणं अभिनेता अक्षय कुमार याच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये अक्षयने भन्नाट डान्स स्टेप केल्यामुळे हे गाणं तरुणाईमध्ये लोकप्रिय होत आहे. त्यातच या गाण्यावर रितेश देशमुखने त्याच्या मुलांसोबत ठेका धरला आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button