breaking-newsपुणे

शहरात रविवारी वर्तुळाकार वाहतूक

पुणे – गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीसाठी रविवारी (ता. २३) शहराच्या मध्यवर्ती भागातील लक्ष्मी रस्ता, टिळक रस्ता,  शिवाजी रस्ता, कुमठेकर रस्ता व केळकर या प्रमुख विसर्जन मार्गांसह १७ रस्ते वाहतुकीस बंद ठेवले जाणार आहेत. दरम्यान, वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पर्यायी वर्तुळाकार मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

असा वर्तुळाकार मार्ग
कर्वे रस्ता, नळस्टॉप चौक, विधी महाविद्यालय रस्ता, सेनापती बापट रस्ता, गणेशखिंड रस्ता, वेधशाळा चौक, संचेती रुग्णालय, शाहीर अमर शेख चौक, मालधक्का चौक, बोल्हाई चौक, नरपतगिरी चौक, नेहरू रस्ता, संत कबीर चौक, ढोले पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), वखार महामंडळ चौक, शिवनेरी रस्ता, गुलटेकडी, मार्केट यार्ड, सातारा रस्ता, व्होल्गा चौक, मित्रमंडळ चौक, सिंहगड रस्ता, लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूल, नळस्टॉप चौक.

विसर्जन मिरवणुकीदरम्यान बंद रस्ते 
शिवाजी रस्ता – काकासाहेब गाडगीळ पुतळा चौक ते जेधे चौक
लक्ष्मी रस्ता – संत कबीर चौक ते टिळक चौक
बाजीराव रस्ता – बजाज पुतळा ते फुटका बुरुज चौक
कुमठेकर रस्ता – टिळक चौक ते चितळे मिठाईवाले
केळकर रस्ता – बुधवार चौक ते टिळक चौक
टिळक रस्ता – जेधे चौक ते टिळक चौक
शास्त्री रस्ता – सेनादत्त पोलिस चौकी ते टिळक चौक

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button