breaking-newsआरोग्य

#CoronaVirus:मधुमेही रुग्णांना कोरोनाचा अधिक धोका?

लंडन : कोरोना व्हायरसबाधित व्यक्ती कोरोनाशी लढणं हीच एक मोठी लढाई असते. मात्र रुग्ण आधीच इतर दुसऱ्या आजारांनी पिडित असल्यास ही लढाई अधिक कठिण ठरते. एका अध्ययनानुसार, रुग्णालयात भरती असलेल्या 10 कोरोना व्हायरस रुग्णांपैकी एक ज्यांना मधुमेह आहे, त्यांची भरती झाल्यापासून सात दिवसांच्या आत त्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्याशिवाय 5 पैकी एका व्यक्तीला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासू शकते, असं सांगण्यात आलं आहे.

या अभ्यासात असं दिसून आलं आहे की, 47 टक्के रुग्णांना डोळे, मूत्रपिंड, नसा यासंबंधी समस्या होत्या. तर 41 टक्के रुग्णांना हृदय, मेंदू आणि पायासंबंधी समस्या होत्या. संशोधकांनी सांगितलं की, 5 पैकी एका रुग्णाला सातव्या दिवसापर्यंत व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. या दरम्यान 10 पैकी एकाचा मृत्यू झाला होता. तर 18 टक्के लोक बरे होऊन घरी गेले होते.

संशोधकांनी सांगितलं की, सातव्या दिवशी, सूक्ष्म रक्तवहिन्यासंबंधी गुंतागुंत झाल्यामुळे मृत्यूचा धोका दुप्पट झाला. त्याशिवाय वाढत्या वयामुळेही मृत्यूचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला. 75 वर्षांच्या अधिक वय असणाऱ्या रुग्णांमध्ये, 55 वर्षाहून कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत मृत्यू होण्याची शक्यता 14 टक्के अधिक असते. 

संशोधकांनी या अध्ययनातून सांगितलं की, अनेक काळापासून मधुमेह असणारे, श्वासासंबंधी समस्या असणाऱ्या वृद्धांमध्ये मृत्यूचा धोका अधिक असू शकतो. कोरोनापासून वाचण्यासाठी त्यांनी खास काळजी घेणं आवश्यक ठरु शकतं. मात्र 65 वर्षाहून कमी वय असणारे रुग्ण ज्यांना टाईप 1 मधुमेह आहे, अशा कोणत्याही रुग्णांचा मृत्यू झाला नाही. अध्ययनादरम्यान टाईप 1 मधुमेह असणारे केवळ 39 रुग्ण होते आणि अशा रुग्णांमध्ये कोरोनाचा प्रभाव पाहण्यासाठी अधिक संशोधनाची गरज असल्याचंही सांगण्यात आलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button