breaking-newsपिंपरी / चिंचवड

#Lockdown : वाढदिवसाचा खर्च टाळून गरजुंना अन्नधान्य वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते विजय वडमारे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेली संचारबंदी लक्षात घेता वाढदिवसाचा अनावशक खर्च टाळून ५० गरजूंना ७ दिवस पुरेल असे कीट वाटप करण्यात आले. त्यामध्ये ५ की गहू, ५ की तांदूळ, १ की तेल, शेंगदाणे १ की, १ की पोहे, तूरडाळ १ की,१ की मिरची पावडर, हळद पॉकेट, १ की बेसन असे वाटप करण्यात आले.

एवढेच नाही तर, विजय वडमारे हे २०११ पासून समाज सेवा करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या ३ वर्षात विधवा व घटस्फोटीत ३०० महिला भगिनींना मोफत पेन्शन सेवा चालू करून दिली. तसेच, २०० अपंगाना व्यवसाय करण्यासाठी ‘उध्योग आधार’ व ‘शॉप अॅक्ट’ कार्ड मोफत काढून देण्यात आले.

तसेच, २०११ ते २०२० पर्यंत २० हजार पेक्षा जास्त जनतेच सेवा रुपी मोफत आधार कार्ड काढून दिले व अनेक सारे स्वच्छता अभियाने त्यांनी स्वातः राबविले. श्री क्षेत्र आळंदी येथे येणाऱ्या माऊलींच्या दिंडीमध्ये सुद्धा त्यांनी स्वच्छता अभियान राबून अस्वच्छतेपासून पर्यावरणाला व समाज्याला होणाऱ्या हानीपासून वाचवले आहे. अशा प्रकारचे अनेक सामाजिक कार्य त्यांनी स्वतःच्या वाढदिवसाचा अनावशक खर्च टाळून केले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button