breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

लाखो चाहत्यांची टेनिसपट्टू आणि रशियन ब्यूटी मारियाने केलं टेनिसला अलविदा…

टेनिस कोर्टवरील आपल्या दमदार कामगिरीसह आपल्या अदाकारीने लाखो टेनिस चाहत्यांच्या मनात घर करणारी रशियन ब्यूटी मारिया शारापोव्हाने टेनिसला अलविदा म्हटलंय… ३२ वर्षीय मारियाने बुधवारी तिच्या निवृतीची घोषणा केली. महिला टेनिसच्या जागतिक क्रमवारीत अव्वलस्थानी राहिलेल्या मारियाने पाचवेळा ग्रँडस्लॅम स्पर्धा गाजवली आहे. 

वयाच्या चौथ्या वर्षी आपल्या वडिलांसोबत टेनिसच्या कोर्टवर पाऊल टाकलेली मारिया गेल्या काही दिवसांपासून दुखापतीने त्रस्त होती. २०१२ मध्ये तिने लंडन ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई केली होती. मारियाने २००४ मध्ये विम्बल्डन स्पर्धा जिंकत कारकिर्दीतील पहिल्या ग्रँडस्लमवर नाव कोरले होते. त्यानंतर अमेरिकन ओपन (२००६), ऑस्ट्रेलियन ओपन (२००८), आणि २०१२ आणि २०१४ असे दोनवेळा फ्रेंच ओपन स्पर्धा गाजवली. एवढेच नाही तर जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या महिला खेळाडूंच्या फोर्ब्सच्या यादीतही तिने छाप सोडली होती.  

२०१६ मध्ये मारियावर उत्तेजकद्रव्य सेवन केल्याचा ठपका पडला. मेलडोनियमच्या सेवनामुळे ‘वाडा’ अर्थात जागतिक उत्तेजक प्रतिबंधक संघटनेने तिच्यावर बंदीची कारवाई केली होती. या कारवाईनंतर ती पुन्हा कोर्टवर उतरली पण दुखापतीमुळे ती खेळात सातत्य दाखवू शकली नाही. परिणामी क्रमवारीत तिची घसरण होत राहिली. अखेर तिने टेनिसमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button