breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा, माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली – सुशिलकुमार शिंदे

सोलापूर | महाईन्यूज | प्रतिनिधी

अजूनही मोदीबाबाची थोडी थोडी हवा आहे. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की ते चांगलं काम करतायत. पण, माझा भ्रमनिरास झाला, अशा शैलीत माजी केंद्रीय मंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी भाजपवर टिका केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज येथे सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यकर्ता मेळावा आयोजित केला होता. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना शिंदे म्हणाले की, शिवसेनेला आम्ही किमान समान कार्यक्रमात समाविष्ठ करुन महाराष्ट्रात धर्मनिरपेक्ष सरकार आणलं. ही सुरुवात आहे. आता जास्त जबाबदारी वाढली आहे. गावागावातील तरुण पोरं…. मला माहितीय की अजूनही मोदीबाबाची हवा थोडी थोडी आहे. त्यांनी जादू आमच्यावर केली होती. माझ्यासारख्या माणसावरही त्यांनी जादू केली होती. मी सुद्धा सुरुवातीची दोन वर्षे म्हणत होतो की ते चांगलं काम करतायत. पण देशाची आर्थिक स्थिती बिघडायला लागली, तरुणांना नोकरी देण्याबाबत दिशाभूल व्हायला लागली, जाती- जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. धर्मा-धर्मात वेडी वाकडी भूमिका घेऊन देश बिघडवण्याचं काम सुरु आहे”.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारतात आले होते. मोदींनी भाषण करुन त्यांचं स्वागत केलं. सगळं भाषण जर आपण ऐकलं असेल, तर ट्रम्प आणि मोदी यांच्या मैत्रीविषयीचं आहे. म्हणून कुणीतरी विचारलं, तुम्हाला ट्रम्प पाहिजे की अमेरिकन जनता पाहिजे. वैयक्तिक मैत्री दोघांची असू शकते, पण अमेरिकन जनता आपल्या पाठीशी आहे की नाही हा आमचा सवाल आहे, असं शिंदे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button