breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लांडेवाडी झोपडपट्टी धारकांचे महापालिकेवर ठिय्या

नगरसेविका सिमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन

संमती पत्रासाठी धमक्यांचा निषेध; महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा

पिंपरी | प्रतिनिधी

भोसरीतील लांडेवाडी झोपड्पट्टीधारक महिलांचे शिष्टमंडळ घेऊन नगरसेविका सीमा सावळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची भेट घेतली. सविस्तर चर्चा केली. एसआरएस प्रकल्प महापालिकेने राबवावा, अशी आग्रही मागणी त्यांनी केली. वर्षोनवर्षे इथे राहणाऱ्या गरिबांना पक्की घरे मिळाली पाहिजेत या विषयी दुमत नाही, त्यांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन झाले पाहिजे. त्यासाठी सर्वांची सहमती आहे. पण त्यासाठी कोणी गुंडांना पुढे करून धमाकवत असेल तर ते कदापि सहन करणार नाही, असा इशारा सिमा सावळे यांनी दिला.

नगरसेविका सीमा सावळे यांच्या नेतृत्वाखाली लांडेवाडी झोपड्पट्टीधारकांनी आपल्या मागण्यासाठी महापालिकेवर ठिय्या आंदोलन केले. या वेळी नगरसेविका आशा शेंडगे यांच्यासह महिला उपस्थित होत्या. 

पिंपरी चिंचवड शहरात एसआरए प्रकल्पांला नागरिकांचे समंती पत्र घेण्यासाठी काही ठिकाणी गुंडांकडून दहशत केली जाते अशी तक्रार जेष्ठ नगरसेविका सिमा सावळे यांनी नुकतीच केली होती. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना भेटून त्याबाबतचे वास्तव त्यांनी सांगितले होते. गोरगरीबांना पक्की घरे मिळाली पाहिजेत, पण त्यासाठी त्यांना धमक्या देऊन संमतीपत्र घेणे गैर असल्याचे सिमा सावळे यांनी सांगितले होते. अशा पध्दतीने कोण  धमाकाऊन संमती पत्र घेत असेल तर, कोणालाही भिक घालू नका थेट आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी झोपडीधारकांना केले होते. शहरात अशा प्रकारे कोणी दमदाटी करून गरिबांना त्रास देत असेल तर ते कदापि सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला होता.

आयुक्त हर्डीकर यांच्याशी चर्चा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सिमा सावळे म्हणाल्या, काल रात्री लांडेवाडी झोपडपट्टीत नागरिकांना दहशत निर्माण करण्यात आली होती. या झोपडपट्टीचे एसआरए मध्ये पुनर्वनस करण्याचे नियोजन आहे. हा पुनर्वसन प्रकल्प राबवायचा असेल तर तो त्याच जागी आणि सर्व नागरिकांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्या सहमतीने, संमतीने राबवावा अशी झोपड्पट्टीधारकांची मागणी आहे. पण त्यासाठी कोणा बिल्डर्ससाठी तेथील नागरिकांना कोणी धमकावत आहेत. त्यांची दादागिरी आम्ही कदापि खपवून घेणार नाही. गोरगरीबांना चांगल्या इमारतींमधून घर मिळाले पाहिजे या मताचे आम्ही आहोत. मात्र, त्यांच्याशी चर्चा झाली पाहिजे, धमक्या किंवा दहशत चालणार नाही आणि खपवून घेणार नाही.

सिमा सावळे म्हणाल्या, पिंपरी चिंचवड शहरात वाढत्या नागरिकरणामुळे विशेषत: पुणे व पिंपरी चिंचवड क्षेत्रात खाजगी, शासकीय तसेच निम शासकीय जमीनींवर वसाहती स्वरूपात अतिक्रमणे होऊन मोठया प्रमाणात झोपडपट्टया तयार झाल्या आहेत. त्यामध्ये दिवसेंदिवस अधिक वाढ होत आहे. त्यामुळे अशा सर्व वसाहतींचे महाराष्ट्र झोपडपट्टी क्षेत्र (सुधारणा, निर्मुलन व पुनर्वसन) अधिनियम 1971 च्या तरतुदी व त्यामध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणांन्वये रितसर पुनर्वसन झाले पाहिजे. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण नियमावली अंतर्गत कालबद्ध व नियोजन पद्धतीने पुनर्वसन करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व बाबी विचारात घेऊन झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुणे यांनी पिंपरी शहरातील सुमारे 600 झोपडपट्टयांमधील सुमारे अडीच लाख पात्र झोपडपट्टी धारकांना घरे मिळाली पाहिजेत

सर्व सुविधांयुक्त मोफत घर देऊन त्यांचे पुनर्वसन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम निश्चित केलाय. परंतु लांडेवाडी झोपड्पट्टीधारकांना स्थानिक गुंड धमकावत असल्याचा प्रकार संतापजनक आहे. यावेळी झोपडीधारक महिलांनी आम्हाला जर बिल्डरांनी धमकावलं तर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू, असे जाहीरपणे सांगितले. यावेळी लांडेवाडी झोपड्पट्टीमधील अनेक महिला ,पुरुष ,यांनी महापालिका प्रवेशद्वारासमोर काही काळासाठी ठिय्या मांडला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button