breaking-newsTOP NewsUncategorizedमहाराष्ट्रराजकारण

मंगळवेढा विधानसभा; पार्थ पवारांच्या उमेदवारीबाबत जयंत पाटील यांचा मोठा ‘खुलासा’

भारत भालके यांच्या निधनानंतर मंगळवेढ्यात विधानसभा पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेकांची नावे चर्चेत आहेत. मंगळवेढ्यातील विधानसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, उमेदवारी देण्याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असं स्पष्टीकरण पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिलं आहे. ते कोल्हापुरात बोलत होते.

पार्थ यांनी ही निवडणूक लढवावी, अशी मागणी समर्थकांकडून होत आहे. पार्थ यांचे नाव चर्चेत आल्यानंतर राष्ट्रवादीकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना यासंबंधी प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ‘मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीमध्ये पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यासंदर्भात कुठलीही चर्चा झालेली नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबत पक्षाच्या बैठकीत जो निर्णय होईल, त्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. मात्र, अद्याप पार्थ यांना उमेदवारी देण्याबाबत कुठलीही चर्चा झालेली नाही, असे ते म्हणाले.

वाचाः पश्चिम बंगाल निवडणुक, सौरव गांगुली नव्या इंनिंगसाठी तयार?

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button