breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

रोहित पवार हाजीर हो ; आमदारकी धोक्यात ?

मुंबई | राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार रोहित पवार यांना मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावले आहे. विधानसभा निवडणुकीदरम्यान रोहित पवारांनी भ्रष्ट मार्गांचा वापर केल्याचा आरोप करणारी याचिका माजी मंत्री आणि भाजपा नेते राम शिंदेंनी न्यायालयात दाखल केली आहे.

यानंतर न्यायालयाने रोहित यांना समन्स बजावत त्यांना बाजू मांडण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी त्यांना १३ मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघात रोहित यांच्याविरोधात पराभूत झालेल्या राम शिंदेंनी याचिकेत अनेक गंभीर आरोप केले आहेत. रोहित पवार यांनी निवडणुकीच्या नियमांचा भंग केल्याचं त्यांनी याचिकेत म्हटले.

‘निवडणुकीच्या काळात रोहित पवार यांनी त्यांच्या साखर कारखान्यातल्या १०० कर्मचाऱ्यांच्या वापर करुन पैशांचं वाटप केले. यापैकी अनेक कर्मचाऱ्यांना आपण त्यावेळीच रंगेहात पकडून निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिले होते,’ असे राम शिंदेंनी याचिकेत नमूद केले होते.

व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून मतदारांना प्रभावित केल्याचा आरोपदेखील याचिकेतून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या याचिकेत अनेक ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नावाचादेखील उल्लेख असल्याचे वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. या प्रकरणात न्यायालयाने रोहित पवार यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी १३ मार्चपर्यंतची मुदत दिली आहे.

यानंतर याचिकेवर सुनावणीदेखील होऊ शकते. त्यामुळे रोहित पवार अडचणीत सापडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button