breaking-newsआंतरराष्टीय

ट्रम्प यांच्या इमिग्रेशन पॉलिसीविरोधात हजारोंचे आंदोलन

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वादग्रस्त “इमिग्रेशन’ विषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी आज अमेरिकेतल्या शहरांमध्ये हजारो नागरिकांनी आंदोलन सुरू केले. या धोरणानुसार बेकायदेशीर रहिवाशांना घालवून देण्यासाठी पालकांना त्यांच्या मुलांपासून वेगळे करण्यात यायला लागले आहे. या धोरणानुसार आतापर्यंत 2 हजार मुलांना त्यांच्या पालकांपासून आणि पालनकर्त्यांपासून वेगळे करण्यात आले आहे. नागरिकांनी या धोरणाला तीव्र विरोध करायला सुरुवात केली आहे.

ट्रम्प यांच्या या वादग्रस्त धोरणाला विरोध करण्यासाठी व्हाईट हाऊसच्या परिसरामध्ये दिवसभर हजारो नागरिकांनी आंदोलन केले. त्याच पोरमाणे अन्य शहरांमध्ये आणि लहान शहरांमध्येही डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काल आंदोलन करण्यात आले. हे धोरण अमानवी असल्याची टीका करून कोणत्याही कारणास्तव बेकायदेशीरपणे अमेरिकेमध्ये आलेल्या पालकांना त्यांच्या मुलांपासून वेगळे करण्यात येऊ नये, अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र ट्रम्प यांनी अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहिलेल्यांविरोधातील आपल्या धोरणाबाबत कोणतीही तडजोड न करण्याचे स्पष्ट केले आहे.

जे लोक बेकायदेशीरपणे अमेरिकेत आले आहेत, त्यांना ताबडतोब या रहिवाशांना परत पाठवलेच जाईल, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले आहे. बेकायदेशीर रहिवाशांना वर्षानुवर्षे राहण्याची कोणतीही युक्‍ती यशस्वी होऊ दिली जाणार नाही, असे ट्रम्प यांनी ट्‌विटरवर म्हटले आहे. “रिपब्लिकन पक्षाला समर्थ सीमा हव्यात, गुन्हे नकोत. तर डेमोक्रॅटना खुल्या सीमा आणि गुन्ह्यांबाबत कमकुवतपणा हवा आहे’, अशी शेलकी टीका ट्रम्प यांनी केली आहे.

ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी “अमेरिकन सिव्हील लिबर्टीज युनियन’ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे. त्यासाठी “लीडरशीप कॉन्फरन्स ऑन सिव्हील ऍन्ड ह्युमन राईटस. “नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स अलायन्स ऍन्ड मुव्ह ऑन’ या संघटनांचे एकत्रित प्रयत्न सुरू आहेत. ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध करण्यासाठी प्रसिद्ध गायक, कलाकार, लेखक आणि अन्य सेलिब्रिटीही सहभागी झाल्या आहेत. याशिवाय मोठ्या कंपन्यांच्या पदाधिकाऱ्यांनीही या धोरणाला विरोध केला आहे. प्रसिद्ध कार्यकर्ते आणि खासदारांनीही ट्रम्प यांच्या धोरणाला विरोध दर्शवला आहे. न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, ऍटलांटा आदी ठिकाणी ट्रम्प यांच्या धोरणाच्या विरोधात मोर्चे निघाले आहेत.

आतापर्यंत अमेरिकेत बेकायदेशीरपणे वास्तव्य केल्याच्या आरोपाखाली 2,300 मुलांना पालकांपासून वेगळे करून अटक करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button