breaking-newsपिंपरी / चिंचवड

रेशन दुकानदार, वाहनचालक, कामगार, हमाल‌ यांना विमा संरक्षण द्या – माजी खासदार गजानन बाबर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

देशात तसे महाराष्ट्रात कोरोना साथीचा प्रादुर्भाव वाढत आहे. दिवसेंदिवस नागरिकांची समस्या वाढत आहेत. कोरोनासारख्या आजारावर मात करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार निरनिराळ्या विविध उपाययोजना राबवित आहे. अशा परिस्थितीत जीवनावश्‍यक वस्तूंचे वितरण करणे किंवा जीवनाश्यक वस्तू लोकांच्या घरापर्यंत पोहोचवणे ही फार जोखमीची बाब आहे. कोरोनाव्हायरस साथीच्या आजाराच्या काळामध्ये पुढील तीन महिन्यासाठी 25 लाखापर्यंतचे विमा संरक्षण रेशनिंग दुकानदार, त्यांच्या कामगारांना, तसेच रेशनिंग दुकान ते गोडाऊन वाहतूक करणारे ड्रायव्हर, गाडीवरील हमाल व गोडाऊनमधील हमाल व कर्मचारी वर्ग यांना देण्यात यावे, अशी मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी अन्न व नागरी पुरवठा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली आहे.

राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब यांनी ग्रामपंचायतीतील कर्मचारी वर्ग अंगणवाडी कर्मचारी, मिनी अंगणवाडीतील कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस कर्मचारी कामगार वर्गाला पगारा व्यतिरिक्त प्रोत्साहनपर एक हजार रुपये व केंद्र सरकारच्या धर्तीवर 25 लाखांचे विमा संरक्षण तीन महिन्याकरता दिले आहे. हे आनंदाची व चांगली बाब आहे. कारण की हा आरोग्याच्या व जीवनाशी निगडित प्रश्न आहे.
       

महाराष्ट्रामध्ये एकूण 52000 रेशनिंग दुकाने आहेत.  दुकानदारांना व त्यांच्या कामगारांना धान्य वितरित करताना रेशनिंग दुकानदारांचा, रेशनिंग दुकानातील कामगारांचा दैनदिन रेशनिंगच्या कामामध्ये नागरिकांची संपर्क येतो. परंतु, तरी ही रेशनिंग दुकानदार व कामगार नागरिकांना सेवा देत असतात, तसेच रेशनिंग दुकान ते गोडाउन पर्यंत मालवाहतूक करताना गाडीचा ड्रायव्हर, गाडीमधील हमाल गोडाऊन मधील हमाल यांचाही नागरिकांशी संपर्क येतो. यामुळे यांची आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, तसेच कोरोना व्हायरस या साथीच्या काळातही रेशनिंग दुकानदार दुकाने चालू ठेवतात.

रेशनिंग दुकानांमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती कामगार, हमाल, ड्रायव्हर व संबंधित कर्मचारी वर्ग हे खूप गरीब असतात त्यांचे हातावरचे पोट असते त्यांचा दैनंदिन नागरिकांची संपर्क येत असतो म्हणून माझी आपणास नम्र विनंती आहे की रेशनिंग दुकानदार, दुकानातील कामगार, कर्मचारी वर्ग, दुकान ते गोडाऊन वाहतूक करणारे हमाल, ड्रायव्हर व गोडाऊनमधील हमाल या सर्वांना पुढील तीन महिन्यांकरिता 25 लाखांपर्यंतचे विमा कवच आपण आपल्या विभागामार्फत देण्यात यावे, अशी‌ मागणी माजी खासदार गजानन बाबर यांनी निवेदनात केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button