breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

रेल्वेचे 20 हजार डबे झाले आता विलगीकरण कक्ष; डब्यांमध्ये 3 लाखांपेक्षा जास्त बेडची व्यवस्था

भारतीय रेल्वे २० हजार डब्यांना विलगीकरण कक्षांमध्ये बदलण्यात येणार आहे. या डब्यांमध्ये एकूण ३.२ लाखांपेक्षा जास्त बेडची व्यवस्था होणार आहे. डब्यांचं रुपांतर विलगीकरण कक्षांमध्ये होण्यासाठी सशस्त्र बल वैद्यकीय सेवा, विविध विभागीय वैद्यकीय विभाग, आयुष्मान भारत आणि आरोग्य मंत्रालयाचा सल्ला घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने माहिती दिल्यानुसार, सर्वात अगोदर ५ हजार डब्यांचं रुपांतर विलगीकरण कक्षांमध्ये करण्याचं काम सुरू आहे. यामुळे ८० हजार बेड तयार होतील.

विविध राज्यात करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या आठवड्यात गुजरातमध्ये ६ दिवसातच २२०० बेडचं रुग्णालय तयार करण्यात आलं. अहमदाबाद, राजकोट, सूरत आणि बडोद्यात हे रुग्णालय तयार करण्यात आलं.

चीनप्रमाणेच भारतातही १००० बेडचं रुग्णालय तयार होत आहे. ओदिशात हे रुग्णालय तयार होत असून करोनासाठी तयार झालेलं देशातील सर्वात मोठं रुग्णालय असेल.

करोनाशी लढा देण्यासाठी उद्योजकही साथ देत आहेत. रिलायन्सने मुंबईत दोन आठवड्यात १०० बेडचं करोना स्पेशल देशातील पहिलं रुग्णालय तयार केलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button