breaking-newsताज्या घडामोडी

रेशन दुकानदारांना मारहाण करणं चूक, काळाबाजार करणाऱ्यांवर कारवाई : छगन भुजबळ

नाशिक | राज्यात काही रेशन दुकानदारांनी गडबड केली असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्याबाबत सरकारने कारवाई केली आहे. आम्ही अशा काळाबाजार करणाऱ्या दुकानदारांवर आम्ही कारवाई करत आहोत. मात्र काही ठिकाणी दुकानदारांना मारहाण करण्याचे प्रकार घडलेत. दुकानदारांना मारहान करणे चुकीचे आहे.

मारहाणीच्या घटना थांबल्या नाही तर रेशन दुकानांना पोलीस संरक्षण देण्यात येईल. याबाबत महसूल अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे, अशी माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. आज भुजबळ यांनी नाशिकमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

यावेळी ते म्हणाले की, राज्यात रेशन दुकानदारांविरोधात 19 एप्रिलपर्यंत 39 गुन्हे दाखल झालेत. अनेक दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. राज्यात 14 हजार तक्रारी आल्या असून 8 ते 9 हजार तक्रारी निकाली काढल्या आहेत, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या दुकानं सुरु करण्याच्या निर्णयाचं स्वागच देखील केलं. अर्थव्यवस्था सुरू झाली पाहिजे. केंद्राने दुकाने सुरू करण्याचा निर्णय घेतला तो स्वागतार्ह आहे, असं ते म्हणाले. 100 टक्के सगळीकडे दुकानं सुरू होईल असं शक्य नाही. धोकादायक भागात दुकानं सुरू होणार नाहीत, असंही त्यांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button