breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

११ राज्यामध्ये ५६ जागांवर पोटनिवडणुका जाहीर

नवी दिल्ली – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पाठोपाठ मुख्यनिवडणूक आयोगाने मध्यप्रदेश, गुजरात, ओडिशा, नागालँड तसेच मणिपूरसह विविध राज्यातील ५६ विधानसभा तसेच एक लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तारखांची घोषणा केली आहे. या सर्व जागांसाठी ३ नोव्हेंबरला मतदार प्रक्रिया पार पडेल. १० नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येईल, असे आयोगाकडून जाहिर करण्यात आले आहे.

दरम्यान आसाम, केरळ, तामिळनाडू तसेच पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या ७ जागांवर तूर्त पोटनिवडणूकन घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. बिहारमधील वाल्मीकीनगर लोकसभा मतदारसंघात ७ नोव्हेंबरला पोटनिवडणूक घेण्यात येईल. तर, १० नोव्हेंबरला मतमोजणी करण्यात येणार आहे. मणिपूरमधील रिक्त ४ विधानसभा मतदारसंघात ७ नोव्हेंबरला मतदान प्रक्रिया पार पडेल.

आसाममधील रंगपारा, सिबसागर मतदारसंघ, केरळमधील कुट्टनाद तसेच चवारा मतदारसंघ, तामिळनाडूतील तिरूवोटियूर, गुडियाट्टम (एससी) तसेच फलकट (एससी)मतदारसंघावर सध्या पोटनिवडणूक घेण्यात येणार नाही. या राज्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित राज्यांसोबत पोटनिवडणुकी संबंधी चर्चा केल्यानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

या राज्यात पोटनिवडणूक

मध्य प्रदेशातील सर्वाधिक २८ विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. मध्य प्रदेशासह गुजरात (८), उत्तरप्रदेश (७), ओडिशा, नागालँड, मणिपूर, झारखंड, कर्नाटकमधील प्रत्येकी २ जागांवर, तर छत्तीसगढ, हरियाणा आणि तेलंगणातील प्रत्येकी एका विधानसभा जागेवर पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button