breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

रेल्वे स्थानकात पाठलाग करुन तरुणीचे घेतले बळजबरीने चुंबन

तरुणीचा पाठलाग करत जबरदस्तीनने चुंबन घेणाऱ्या 25 वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. रविवारी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाबाहेर हा प्रकार घडला. आरोपीचं नाव वसीम शेख असून तो पवईचा रहिवासी आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आणि आरोपी तरुण एकाच परिसरात राहतात. आरोपी वसीमने अनेकदा तरुणीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तरुणीने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. यानंतरही वसीम शेख अनेकदा तरुणीचा पाठलाग करत होता.

रविवारीही आरोपी वसीमने विक्रोळीत तरुणीचा पाठलाग केला. तरुणीने रेल्वे स्थानकात प्रवेश करताच आरोपी वसीमने हात पकडला आणि जबरदस्तीने खेचत तरुणीला बाहेर नेलं. यानंतर त्याने सर्व लोकांसमोरच तरुणीचं चुंबन घेतलं.

‘तरुणीने कुटुंबीयांना घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितलं असता त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. यानंतर आम्ही तात्काळ गुन्हा दाखल करत तपास सुरु केला. चालक म्हणून काम करणाऱ्या आरोपी वसीमचा शोध घेण्यासाठी आम्ही टीम पाठवली. आम्ही त्याच्या घरातून त्याला अटक केली आहे’, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. आरोपी वसीम शेख विवाहित असून त्याला एक मुलगा आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button