breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
रेल्वेच्या तीनही मार्गावर आज मेगाब्लॉक
विविध कामांसाठी रेल्वेच्या तीनही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वे मुख्य मार्गावर माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग, वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही मार्गावर आणि सांताक्रूझ ते माहीम अप धिम्या मार्गावर ब्लॉक असेल. त्यामुळे लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावणार आहेत.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
- कुठे- माटुंगा ते मुलुंड डाऊन जलद मार्ग
- कधी- स.१०.३० ते दु.३.००
- परिणाम- सीएसएमटी स्थानकातून सुटणाऱ्या जलद व अर्ध जलद लोकल गाडय़ा माटुंगा ते मुलुंडदरम्यान डाऊन धिम्या मार्गावर चालवण्यात येतील. मुलुंडनंतर पुन्हा डाऊन जलद मार्गावर लोकल धावतील.
हार्बर रेल्वे
- कुठे- वडाळा रोड ते मानखुर्द दोन्ही मार्गावर
- कधी- स.११.१० ते दु.३.४० वा.
- परिणाम- ब्लॉक काळात सीएसएमटी ते वाशी, बेलापूर, पनवेलदरम्यानच्या दोन्ही मार्गावरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
पश्चिम रेल्वे
- कुठे- सांताक्रूझ ते माहीम अप धिमा मार्ग
- कधी- स. १०.३५ ते दु. ३.३५ वा.
- परिणाम- ब्लॉककाळात चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या मार्गावरील लोकल गाडय़ा खार रोड ते मुंबई सेन्ट्रलदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील. माहीम, माटुंगा रोड, प्रभादेवी, लोअर परळ, महालक्ष्मी स्थानकात चर्चगेटकडे जाणाऱ्या धिम्या लोकल थांबणार नाहीत.