breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईत कालपासून पावसाचा वाढता जोर, 2 दिवस सतर्क राहण्याचा मुंबईकरांना इशारा

मुंबईत कालपासून चांगलाच जोर पकडला आहे त्यामुळे, हवामान खात्याने आज पुन्हा ट्विट करून दोन दिवस सतर्क राहण्याचा इशारा मुंबईकरांना दिला आहे. त्यामुळे आज आणि गुरुवारी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी ट्विट करून मुंबईकरांना सावध राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

” मुंबई की बारिश… दो दिन प्लीज सतर्क रहे… मौसम विभाग,” असं ट्विट होसाळीकर यांनी केलं आहे. त्यामुळे मुंबईत आज आणि उद्या अति जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईकरांना या आधीच कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच मच्छिमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्यास सांगण्यात आले आहे.

या दोन दिवसात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी तुंबण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होऊ शकते. त्याशिवाय रेल्वे रुळावरही पाणी भरण्याची शक्यता असल्याने रेल्वे आणि परिवहन सेवांना सतर्क राहण्याच्या सूचनाही हवामान विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तसेच होसाळीकर यांनी मुंबई, ठाणे आणि कोकणातीलही नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button