breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

रुग्णांच्या टाळुवरचं लोणी खाण्यासाठी भाजप सक्रिय, अवघ्या दहा मिनिटात भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण [VIDEO]

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – संतपीठाच्या भ्रष्ट निविदा प्रक्रियेतून सभागृह तहकुबीची नामुष्की ओढवलेली असतानाच भाजपच्या महापौरांनी पुन्हा सभागृह चालू झाल्यानंतर तिव्र विरोध असताना भोसरी रुग्णालयाचे खासगीकरण करण्याचा विषय अवघ्या दहा मिनिटांत विनाचर्चा मंजूर केला. विरोधकांचा विरोध जुगारून रुग्णांच्या टाळूवरचं लोणी खाण्यासाठी भाजप पदाधिकारी महापालिकेच्या सभागृहात सक्रिय झाल्याचा प्रत्यय आला.

भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाच्या विषयाला विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी पूर्वीपासूनच विरोध केला आहे. तो विषय आज सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. तत्पुर्वीच संतपीठाच्या विषयावरून विरोधकांनी सभागृहात राडा घातला. त्यात गोंधळ उडाल्याने कोणाचा मेळ कोणाला लागेनासा झाला होता. सत्ताधारी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी आणि नारेबाजी होत असतानाच दस्तुरखुद्द महापौर राहूल जाधव यांनी गोंधळाचा फायदा घेत भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय मारून नेला.

दुपारी तीन वाजून 40 मिनिटाला दुसरी सर्वसाधारण सभा सुरू झाली. आणि 3 वाजून 50 मिनिटाला सभा संपली. अवघ्या दहा मिनिटांत भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणाचा विषय भाजप पदाधिका-यांनी मानमानी करून विनाचर्चा मंजूर केला. विरोधकांचा विरोध महापौर राहूल जाधव यांनी जुगारून टाकला. भाजपच्या या मनमानीमुळे रुग्णांच्या टाळुवरचे लोणी खाण्यासाठी महापालिकेत भाजप सक्रिय झाल्याचा प्रत्यय येत आहे, अशी चर्चा नगरसेवकच करू लागले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button