breaking-newsराष्ट्रिय

रिलायन्सने रचला इतिहास; ९ लाख कोटी मार्केट कॅप असणारी देशातील पहिली कंपनी

मुंबई – मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने इतिहास रचला आहे. नऊ लाख कोटींचे बाजार भांडवल असणारी रिलायन्स ही देशातील पहिली कंपनी ठरली आहे. हे बाजार भांडवल सहा सरकारी कंपन्यांएवढे आहे. आज सुरुवातीला कंपनीचा शेअर २ टक्क्यांनी वधारला आणि त्यानंतर कंपनीचा शेअर १,४२३ रुपयांवर पोहचला. जानेवारीपासून रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर २६ टक्क्यांनी वाढला आहे.

पेट्रोलियम, रिटेल आणि टेलिकॉमसारख्या विविध क्षेत्रात पसरलेल्या रिलायन्सने आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये एकूण ६.२३ लाख कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button