breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमुंबई

तेलंगणाच्या मानसा वाराणसीच्या डोक्यावर मिस इंडियाचा ताज

मुंबई – तेलंगणाच्या मानसा वाराणसीने मिस इंडिया 2020चा किताब पटवला आहे. मुंबईत बुधवारी रात्री मिस इंडिया 2020च्या ग्रँड फिनालेचे आयोजन करण्यात आले होते. टॉप 3 मध्ये मिस इंडिया 2020चा किताब मानसा वाराणसीला मिळाला. तर मिस इंडिया वर्ल्ड 2020 मान सिंहला देण्यात आला. तर फेमिना मिस इंडिया 2020 रनर-अप मनिका शोकंद बनली.

कोरोना महामारीमुळे मिस इंडियाच्या इतिहासात पहिल्यांदाच स्पर्धेच्या पूर्ण प्रक्रियेला डिजीटल रुपात आयोजित करण्यात आले होते. हे मिस इंडिया 2020चे 57वे आयोजन होते. यादरम्यान, मानसा वाराणसी, मान सिंह, मनिका शोकंद एकमेकींसोबत आपल्या विजयाचे सेलिब्रेशन करताना दिसून आल्या. तसेच मिस इंडिया 2020च्या दिमाखदार फिनालेचे होस्टिंग अभिनेता अपारशक्ती खुरानाने केले. तर यावेळी अभिनेत्री चित्रांगदा सिंहही या फिनालेला उपस्थित होती. दरम्यान, मिस इंडिया 2020 बनलेली मानसा वाराणसी ही 23 वर्षांची आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगणा हा किताबही आपल्या नावावर केला आहे.

https://www.instagram.com/p/CLH1hijAXfr/?utm_source=ig_embed&ig_mid=79CE29DC-C0C0-4CC2-8267-DFE0A5896621

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button