breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

रिया चक्रवर्तीला जामिन मिळाल्यानंतर माध्यमांनी तिचा पाठलाग केला तर वाहन जप्त करण्याचा पोलिसांनी दिला इशारा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. तिचा भाऊ शौविक यांचा जामीन मात्र फेटाळण्यात आला आहे. रिया चक्रवर्तीला जामिन मिळाल्यानंतर माध्यमांनी तिचा पाठलाग करु नये अशी सूचना मुंबई पोलिसांनी केली आहे.नाहीतर मोटार वाहन कायद्यांतर्गत वाहन जप्त करण्यात येईल, असंही पोलिसांनी इशारा दिला आहे.


ड्रग्ज प्रकरणी ८ सप्टेंबरला एनसीबीकडून रियाला अटक करण्यात आली होती. रियासोबत दिपेश सावंत आणि सॅम्युअल मिरांडा यांचाही जामीन हायकोर्टानं मंजूर केला आहे. रियाची १ लाखांच्या जामीनावर तर दीपेश सावंतची ५० हजारांच्या जामिनावर सुटका करण्यात आली आहे. मात्र, रियाचा भाऊ शौविक आणि अब्देल परिहार यांचे जामीन अर्ज हायकोर्टानं फेटाळले आहेत. रिया जेलमधून बाहेर आल्यानंतर माध्यमांनी तिच्याससमोर गर्दी करू नये, यासाठी मुंबई पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे.

‘कोणत्याही प्रकारचा पाठलाग, अडवणूक किंवा रस्त्यावर सिग्नलला गाडी उभी असताना जाऊन त्यांची मुलाखत किंवा त्यांचे चित्रीकरण करणं कायद्यानं गुन्हा आहे. यामुळं तुम्ही स्वतःचे आणि रस्त्यावरील इतर वाहनचालकांचे जीव धोक्यात घालत असता. याबाबत मुंबई पोलीस कडक कारवाई करणार आहेत,’ असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button