breaking-newsआरोग्यताज्या घडामोडीलेख

मुलतानी मातीचे ‘हे’ गजब फायदे

चेहऱ्याची त्वचा मऊ आणि चमकदार दिसावी यासाठी लोक बाजारातील कित्येक महागड्या ब्युटी प्रोडक्टचा वापर करतात. केमिकलयुक्त प्रोडक्ट वापरण्याऐवजी तुम्ही आयुर्वेदिक, नैसर्गिक उपचारांचीही मदत घेऊ पाहा. यामुळे त्वचेला दीर्घ काळासाठी लाभ मिळतील. महत्त्वाचे म्हणजे डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपाय केल्यास दुष्परिणाम होणार नाहीत. त्वचा तसंच केसांसाठी रामबाण आयुर्वेदिक उपाय म्हणजे मुलतानी माती.

मुलतानी मातीचा नेहमीच नॅचरल ब्युटी प्रोडक्टमध्ये वापर केला जातो. मुरुम, मुरुमांचे डाग, काळवंडलेली त्वचा इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी फार पूर्वीपासून मुलतानी मातीचा आयुर्वेदिक उपचारांमध्ये उपयोग होतोय. नितळ आणि डागविरहित त्वचेसाठी हा एक प्रभावी आयुर्वेदिक उपाय आहे. मुलतानी माती आपल्या चेहऱ्यासाठी कशा प्रकारे फायदेशीर ठरते आणि याचा कसा वापर करावा? हे जाणून घेऊयात.

​मुलतानी मातीचे फायदे

मुलतानी मातीमध्ये अ‍ॅसिडिक गुणधर्मांसह खनिजांचा मोठ्या प्रमाणात साठा आहे. यातील अ‍ॅसिडिक घटक त्वचेतील पीएच लेव्हल संतुलित ठेवण्याचे कार्य करते. मुलतानी माती हे आपल्याला निसर्गाने दिलेलं वरदान आहे. पण अद्याप अनेकांना या बहुपयोगी मातीचे लाभ माहिती नाहीत. यातील औषधी गुणधर्म आपल्या त्वचेवरील अतिरिक्त तेल नियंत्रित करण्यास मदत करते. ज्यामुळे मुरुम आणि मृत त्वचेची समस्या दूर होते.

​त्वचेला मिळतो थंडावा

मुलतानी माती नैसर्गिक स्वरुपात आपल्या त्वचेला थंडावा देण्याचे कार्य करते. रोमछिद्रे, सनबर्न, काळवंडलेली त्वचा, रॅशेज, मुरुम, डाग इत्यादी समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर केला जातो. यातील औषधी गुणधर्म त्वचेवरील रोमछिद्रे खोलवर स्वच्छ करतात. यात जमा झालेली दुर्गंध स्वच्छ करून त्वचेमधील रक्ताभिसरण प्रक्रिया नियंत्रणात आणण्याचे कार्य करते. ज्यामुळे त्वचेवर नैसर्गिक चमक दिसू लागते.

​ब्लॅकहेड्स

कहेड्स आणि व्हाइडहेड्सची समस्या दूर करण्यासाठी मुलतानी मातीचा लेप एक प्रभावी उपाय आहे. आपल्या त्वचेला मुलतानी मातीमुळे कित्येक लाभ मिळतात. सौंदर्य अधिक खुलवण्यासाठी या मातीचा कशा पद्धतीने वापर केला जाऊ शकतो. जाणून घेऊया काही घरगुती उपाय

त्वचेवर जमा झालेली दुर्गंध दूर करण्यासाठी

लेप तयार करण्यासाठी अर्धा चमचा मुलतानी माती आणि ताजे दही एकत्र घ्या. जाडसर पेस्ट तयार करा. आपल्या त्वचेवर ही पेस्ट लावून हलक्या हाताने मसाज करावा आणि थोड्या वेळानंतर चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या. क्लींझरच्या स्वरुपात तुम्ही मुलतानी मातीचा वापर करू शकता. तेलकट त्वचेसाठी मुलतानी माती रामबाण उपाय आहे.

​काळवंडलेल्या त्वचेची समस्या

सनटॅन कमी करण्यासाठी मुलतानी मातीचा वापर हा सर्वात चांगला उपाय मानला जातो. पिगमेंटेशन कमी करण्यासाठी आणि स्किन टोन ठीक करण्यासाठी मुलतानी मातीचा आपल्या स्किन केअर रुटीनमध्ये समावेश करावा. यापासून एक घरगुती फेस पॅक तयार करा. काळवंडलेल्या त्वचेवर लेप लावावा. या नैसर्गिक उपचारामुळे तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.

​फेस पॅक तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये एक चमचा मुलतानी माती घ्या. त्यामध्ये एक चमचा टोमॅटोचा रस, लिंबू रस, दूध आणि मध मिक्स करा. पेस्ट तयार झाल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर १५ मिनिटांसाठी लावून ठेवा. यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या.

मुरुमांची समस्या कमी करण्यासाठी

मुलतानी मातीतील गुणधर्म मुरुम कमी करण्यासाठी आणि ब्लॅकहेड्स काढण्यासाठीही मदत करतात.

२० मिनिटांसाठी मुलतानी माती दह्यामध्ये भिजत ठेवा. यानंतर दही आणि मुलतानी माती एकजीव करून घ्या. त्यामध्ये पुदिन्याची ताजी पानेही मिक्स करा. सर्व साम्रगींची पेस्ट तयार करा. हा लेप १५ मिनिटांसाठी चेहरा आणि मानेवर लावा. थोड्या वेळाने चेहरा थंड पाण्याने धुऊन घ्या.

मुलतानी माती फेस पॅक

मुलतानी मातीतील गुणधर्म तुमची त्वचा नैसर्गिक स्वरुपात उजळण्याचे कार्य करतात. लेप तयार करण्यासाठी दोन चमचे मुलतानी माती घ्या. यामध्ये दही, मध आणि कोरफडीचा रस मिक्स करा. सर्व सामग्री चांगल्या पद्धतीने एकजीव करा. हा लेप चेहरा आणि मानेवर लावून ठेवा. लेप सुकल्यानंतर चेहऱ्यावर गुलाब पाणी लावा. आता हलक्या हाताने चेहऱ्याचा मसाज करा. थोड्या वेळानंतर थंड पाण्याने त्वचा स्वच्छ धुऊन घ्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button