breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

धक्कादायक! भरधाव वाहनाच्या धडकेत दोन शिक्षिकांचा जागेवरच मृत्यू

भरधाव वेगातील वाहनाने पाठीमागून ठोकर दिल्याने स्कुटीवर असलेल्या दोन शिक्षिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. शुक्रवारी दुपारी ४ वाजल्याच्या सुमारास सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर ही दुर्घटना घडली आहे. मयत दोन्ही शिक्षीका या सोलापूर जिल्ह्यातील असून अणदूर येथील जिल्हा परिषद शाळेत त्या शालेय समितीच्या बैठकीसाठी आलेल्या होत्या. तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील वत्सलानगर जिल्हा परिषद शाळेत शुक्रवारी शिक्षण समितीची बैठक होती.

दुपारी बैठक पार पडल्यानंतर पाठ्यपुस्तके घेऊन सोलापूरच्या भंडारकवठे येथील शशिकला नागेश कोळी (वय ३४) आणि रोहिणी शंकर सपाटे (वय ३५) या दोघी शिक्षिका दुपारी साडेतीन वाजल्याच्या सुमारास परत निघाल्या. ४ वाजण्याच्या सुमारास त्या बाबळगाव तलावानजीक आल्या असत्या, राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ वर भरधाव वेगातील एका अज्ञात वाहनाने पांढर्‍या रंगाच्या एक्टिवा (एमएच 13-सीएच 9867) ला पाठीमागून जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, मयत महिलांची गाडी जवळपास ५० फूट लांब घसरत गेली. ज्यात दोन्ही शिक्षीकांना आपले प्राण गमवावे लागले. अपघातानंतर इटकळ दुरक्षेत्राच्या पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button