breaking-newsआंतरराष्टीय

अफगाण अन् तालिबानला उज्बेकिस्तानचा प्रस्ताव

ताश्कंद : उज्बेकिस्तानने अफगाणिस्तानचे सरकार आणि तालिबानला शांतता चर्चेचे निमंत्रण पाठविले आहे. दोन्ही बाजूंमधील चर्चेनंतर युद्धविराम अनिश्चित काळासाठी वाढविला जाऊ शकतो, अशी अपेक्षा आहे. आम्ही शांतता प्रक्रिया पुढे नेण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. अफगाणिस्तान आणि तालिबान यांच्यात थेट चर्चा घडवून आणण्यासाठी उज्बेकिस्तानच्या भूमीवर आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील असे त्याच्या विदेश मंत्रालयाने म्हटले.

अफगाणिस्तानात शांतता आणि स्थैर्य नांदावे याकरता उज्बेकिस्तानने मार्च महिन्यात अफगाण शांतता संमेलनाचे आयोजन केले होते. परंतु तालिबानने यात भाग घेतला नव्हता. शांतता प्रक्रियेसाठी तालिबानच्या नेतृत्वासोबत संपर्क साधल्याचे उज्बेकिस्तानने म्हटले. अफगाण सरकारच्या युद्धविरामच्या घोषणेनंतर तालिबानने देखील शुक्रवारी तीन दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. परंतु तालिबानने विदेशी सैन्याला यातून वगळले होते.


Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button