breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही’; पंकजा मुंडेंचा निर्धार

२०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष

मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा बांधणार नाही, असा निर्धार भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. तसेच २०२४ इतिहास घडवणारं म्हणजेच बदलणारं वर्ष आहे, असंही पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या बीडमध्ये एका कार्यक्रमाक बोलत होत्या.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला राजेंद्र मस्के म्हणाले, फेटा बांधा..मी म्हटलं फेटा बांधणार नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत मी फेटा बांधणार नाही. ओबीसी समाजाचं आरक्षण धोक्यात आल्यावर गळ्यात कोणतीही फुलाची माळ गळ्यात घालणार नाही, असं सांगितलं होतं. आता ओबीसी आरक्षण वाचलं आणि लोकांनी गळ्यात हार घातले.

हेही वाचा – चिखली-तळवडेच्या ‘कनेक्टिव्हीटी’ला मिळणार चालना!

आपल्याला दुधही पोळलेलं असून ताकही फुंकून पिण्याची वेळ आली आहे. त्यामुळे २०२४ हे वर्ष इतिहास घडवणारं म्हणजेच इतिहास बदलणारं वर्ष आहे. मला माध्यमांनी विचारलं, तुम्ही आमदार, खासदार किंवा ग्रामपंचायत सदस्य नाही. मग काय सर्व पक्ष तुम्हाला ऑफर देतात. त्यावर म्हटलं, ते मला माहिती नाही. पण मी सर्वसमावेशक चेहरा झालेली आहे, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.

दरम्यान, पंकजा मुंडे यांच्या विधानावर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, आरक्षणाच्या नावाखाली सरकार आपली जबाबदारी झटकत नाही. आर्थिकदृष्ट्या ज्या माध्यमातून समाजातील मुलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना शिकवता येईल. हे सर्व प्रयत्न राज्य सरकार करत आहे. आरक्षणासाठीही आपण प्रयत्न करत आहोत. पण, त्यासाठी भावनिक मुद्दा करून शेवटी काही साध्य होणार नाही, असं राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button