breaking-newsक्रिडा

राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धा : महाराष्ट्राला एक सुवर्ण, दोन कांस्यपदके

महाराष्ट्राच्या टेबल टेनिस खेळाडूंनी यूटीटी कॅडेट आणि उपकनिष्ठ राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत एक सुवर्ण व दोन कांस्यपदकांची कमाई केली. महाराष्ट्राच्या उपकनिष्ठ मुलांच्या संघाने तामिळनाडूवर विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.

आदिल आनंद आणि राजवीर शाह यांनी चमकदार कामगिरी करत महाराष्ट्राला तमिळनाडूवर ३-२ असा विजय मिळवून दिला. आदिलने अरुण शनमुगमला ३-० असे हरवले. त्याआधी राज प्रेयेश सुरेश याने तामिळनाडूसाठी ३-० असा विजय नोंदवला. आदिलने हविश असरानीसह खेळताना राज व अरुण जोडीला ३-१ असे नमवत महाराष्ट्राला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. आदिलला राजकडून ०-३ असे पराभूत व्हावे लागल्याने सामना २-२ असा रंगतदार स्थितीत पोहोचला. पण राजवीरने संयमाने खेळ करत अरुणवर ३-१ असा विजय नोंदवत महाराष्ट्राला जेतेपद मिळवून दिले.

दरम्यान तनिशा कोटेचा, पृथा वर्थीकर व संपदा भिवंडकर या महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाला उपांत्य फेरीत हरयाणाच्या सुहाना सैनी, प्रेक्षा वोहराकडून १-३ असे पराभूत व्हावे लागले. उपांत्यपूर्व फेरीत महाराष्ट्राने कर्नाटकला ३-२ असे पराभूत केले होते.

मुलींच्या कॅडेट गटात जेनिफर वर्गीस व देवयानी कुलकर्णी यांनाही कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. त्यांना उत्तरप्रदेशच्या अनिका गुप्ता व सुहानी महाजनकडून २-३ असा चुरशीच्या लढतीत पराभवाचा सामना करावा लागला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button