breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर

  • मुंबईत तब्बल 5,185, पुण्यात 6,754 नवे रुग्ण

मुंबई – राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक प्रचंड झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी मास्क लावणे, वारंवार हात धुवणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे अशी काळजी घेणे आवश्यक आहे. राज्यात बुधवारी दिवसभरात 31,855 नव्या रुग्णांची नोंद झाली, तर 95 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 15,098 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली. यासह महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 25,64,881 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 53,684 इतका झाला आहे. त्याचबरोबर आतापर्यंत 22,62,593 जण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या 2,47,299 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

महाराष्ट्राची राजधानी मुंबईत काल दिवसभरात तब्बल 5,185 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. तसेच 2,088 जणांनी कोरोनावर मात केली. यासह मुंबईची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 3,74,611 वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा 11,606 इतका झाला आहे, तर आतापर्यंत मुंबईत 3,31,322 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 30,760 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यात बुधवारी तब्बल 6,754 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. त्यामुळे पुण्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 4,87,966 वर पोहोचली आहे. तर काल दिवसभरात 7 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाल्याने पुण्यातील कोरोनाबळींचा आकडा 8,274 इतका झाला आहे. तसेच पुण्यात आतापर्यंत 4,30,656 जण कोरोनामुक्त झाले असून सध्या 49,036 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button