Uncategorizedपिंपरी / चिंचवडपुणेराजकारण

राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकीचा फोन

राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना धमकी दिल्याची माहिती मिळत आहे. चाकणकर यांच्या कार्यालयातील दूरध्वनीवर एका व्यक्तीने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत कार्यालय पेटवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

याप्रकरणी जयंत रामचंद्र पाटील (रा. तांबवे, ता. वाळवा, जि. सांगली) या व्यक्ति विरोधात सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शुक्रवारी दुपारी चाकणकर यांच्या धायरी येथील कार्यालयातील दूरध्वनीवर जयंत रामचंद्र पाटील या व्यक्तीने फोन करून ‘रूपाली चाकणकर कुठे आहे, मला तिचा मोबाईल नंबर हवा आहे. ती काय करते पाहून घेतो. तिचे धायरी येथील कार्यालय पेटवून देतो’, अशी धमकी दिली.

चाकणकर यांचे स्वीय सहाय्यक राजदीप कठाळे यांनी सदर प्रकार चाकणकर यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यानंतर त्यांनी याबाबत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दाखल केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पूर्वी मनसेच्या रुपाली ठोंबरे पाटील यांनाही पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान फोनवरून धमकी देण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button