breaking-newsताज्या घडामोडीपुणे

विसर्जन पाहण्यास गेलेल्या आजी-नातवाचा अपघाती मृत्यू

पुणे  – गणेश विसर्जनाची मिरवणूक पाहण्यासाठी चाललेल्या आजी व अकरा वर्षाच्या नातवाचा भरधाव होंडा चारचाकीने धडक दिल्याने मृत्यू मृत्यू झाला. तर एक जण जखमी झाला आहे. ही घटना खराडीतील सातववस्ती येथे बुधवारी (ता. 19) सायंकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

चारचाकी चालकाने रस्त्यावरील इतर चार वाहनांनाही धडक दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे नाव नयन रमेश मोकळे (वय 11, सातव वस्ती, खराडी) आणि त्याची आजी कांताबाई साहेबराव सोनूणे (वय 61 रा आंबेडकर नगर, माहूरा,  ता. जाफ्राबाद, जालना) असे आहे. तर महेंद्र लोखंडे (वय 41, रा. सातववस्ती खराडी) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार होंडा सिटी (एम एच 12 एमडी 1011) ही चारचाकी रॅडीसोन हॉटेलकडून सातव वस्तीकडे जात होती. त्यावेळी नातवाला पाहण्यासाठी मुलीकडे आलेल्या कांताबाई आपल्या नातवासह सातव्या दिवसाचे गणपती पहाण्यासाठी रस्त्याच्या बाजूने चालल्या होत्या. त्यावेळी चारचाकीने त्यांना येऊन ठोकरले. त्यात त्यांचा दुर्दैवी अंत झाला.  याप्रकरणी आरोपी सौरभ शशिकांत जासूद (वय 20, रा चंदन नगर) यास अटक करण्यात आले आहे.

नयनचे वडील भारतीय सैन्यात सेवा बजावत आहेत.  मागील महिन्यात नयनच्या धाकट्या भावाचा अपघात झाला होता. ते त्याला पाहण्यासाठी आपल्या पुण्यातील घरी सध्या सुटीवर आलेले आहेत.नेमके याच वेळी दुर्दैवाने थोरल्या मुलाचा अपघात झाला. मोकळे कुटुंबियांवर आभाळ कोसळले. नयन चंदननगर येथील केंद्रीय विद्यालयात शिकत होता.

दोन अपघात झाल्यानंतर चारचाकी चालक तेथून पळून गेला. अपघाताला सोळा तास उलटूनही आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले होते. पोलिसांना जाब विचारण्यासाठी येथे मोठा जमाव जमला होता. त्यानंतर सायंकाळी चारच्या सुमारास आरोपी सौरभ शशिकांत जासूद (वय 20, रा चंदन नगर) यास शिरूर येथून अटक केल्याचे चंदननगरचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मुळीक यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button