breaking-newsपुणे

एनडीए प्रश्‍नी सुळे यांनी घेतली संरक्षणमंत्र्यांची भेट

पुणे-राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए) लगत असलेल्या गावांचे विविध प्रश्‍न, शहरातील बांधकामांना सर्व्हे ऑफ इंडिया आणि संरक्षण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थात एनडीएच्या लगत वसलेल्या गावांच्या विविध प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी आज संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी त्यांच्यासोबत नगरसेवक सचिन दोडके, शुक्राचार्य वांजळे, सुरेश गुजर, खुशाल करंजावणे, प्रवीण शिंदे, सचिन घुगे उपस्थित होते. सुप्रिया सुळे यांनी ही भेट अतिशय समाधानकारक झाली असून संरक्षणमंत्र्यांनी याबाबत सर्वोतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे सांगितले.

खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने घेतलेल्या भेटीमध्ये विविध मुद्यांवर चर्चा झाली. यामध्ये एनडीएमध्ये कार्यरत असणारे परंतु लगतच्या गावांत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना एनडीएतील क्वार्टर्स सोडण्यास सांगितले आहे. याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे महापालिका, एनडीए आणि स्थानिक नागरिकांच्या जमीनीसंदर्भातील मुद्यांवरही या भेटीत चर्चा झाली. याशिवाय परिसरातील चार वाड्यांसाठी पर्यायी रस्ता बांधून देण्याचीही मागणी करण्यात आली.
याशिवाय पुणे एअरपोर्ट स्टेशनच्या परिसरात बांधकाम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र घेण्याची अट रद्द करण्याचा मुद्दा या भेटीत प्राधान्याने चर्चिला गेला. याशिवाय सार्वजनिक वाहतूक अधिक सुरळीत व्हावी यासाठी सुरक्षाभिंत पाडावी, एनडीएच्या आतील भागातील धार्मिक स्थळी कार्यक्रम करण्याबाबत परवानगी आणि एनडीएमध्ये स्थानिक तरुणांना नोकऱ्यामध्ये प्राधान्य देण्याचा मुद्दा देखील यावेळी प्राधान्याने चर्चिण्यात आल्याचे सुप्रिया सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button