breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील अपघातातून बचावले

जळगाव   :  राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ. सतीश पाटील मुंबई येथून पक्षाची बैठक आटोपून गावाकडे परत असतांना अपघातात बालंबाल बचावले. आमदार पाटील यांच्या फॉरच्युनर कारसमोर दुचाकीस्वार आला, त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतांना कार रस्त्याच्या कडेला डीपीच्या तारांवर चढली. यामध्ये पाटीलसह त्यांचा चालक, सुरक्षारक्षक यामध्ये बचावले. हा अपघात पाळधी, ता. धरणगावनजीक आज पहाटे घडला.

आमदार पाटील हे मुंबई येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आटोपून रेल्वेने रविवारी सकाळी जळगाव येथे आले. तेथून ते त्यांच्या कारने पारोळ्याकडे जात असताना पाळधीनजीक एका वळणावर समोर अचानक दुचाकीस्वार आला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. कार रस्त्याच्या बाजूला असलेल्या विद्युत डीपीच्या खांबाला ताण दिलेल्या तारांवर धडकली. यात वाहनाचे पुढील दोन्ही चाक वर चढले. त्यावेळी वाहनात मागे बसलेले आमदार पाटील, स्वीय सहाय्यक भैया माने व रक्षकाने खाली उतरुन कारचा पुढील दरवाजा उघडला. त्या वेळी पाटील यांनी उडी घेतली बाहेर पडले. त्यानंतर दुस-या वाहनाने ते पारोळा येथे घरी पोहचले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button