breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

अंगणवाडी कर्मचा-यांचे मानधन वाढीसाठी महाराष्ट्रभर आंदोलन

मुंबई – सप्टेंबर २०१८ ला पंतप्रधानांनी अंगणवाडी कर्मचा-यांना केंद्रिय मानधन वाढविण्याची घोषणा केली. ब-याच राज्यातून हे वाढीव मानधन दिले गेले. पण महाराष्ट्राने अद्याप दिले नाही ते तातडीने द्यावे व मानधनाचे निम्मी रक्कम निवृत्तीवेतन म्हणून दिली जावी. या दोन प्रमुख मागण्यासाठी महाराष्ट्रभर अंगणवाडी कृती समितीने ३ ते ११ जून या कालावधीत आंदोलन करण्याचे ठरविले आहे.

दि. ११ जून रोजी मंत्रालयावर मोर्चाचे आयोजन केले असले तरी सेविका किंवा मदनीस यापैकी एकजण अंगणवाडी चालु ठेवतील व एक दिवसाची रजा टाकून दुसरी कर्मचारी मुंबई मोर्चात सहभागी होणार आहे. असे प्रसिध्दी पत्रकात कृती समितीच्या कमलताई परूळेकर यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button