breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी नियोजनबध्द काम करा, खासदार बारणेंचा कार्यकर्त्यांना सल्ला

  • युतीच्या उमेदवारांच्या विजयासाठी शिवसैनिकांची वज्रमुठ
  • शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेतला निर्णय

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पुणे जिल्ह्यातून राष्ट्रवादीला हद्दपार करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी शिवसैनिकांनी नियोजनबद्ध दहा दिवसांचा प्रचार कार्यक्रम तयार करावा. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन खासदार श्रीरंग बारणे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना केला आहे.

पिंपरी व चिंचवड विधानसभा क्षेत्रातील महायुतीचे अधिकृत उमेदवार अॅड. गौतम चाबुकस्वार व लक्ष्मण जगताप यांच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी शिवसेना पदाधिकारी यांची बैठक झाली. याप्रसंगी पुणे जिल्हा संपर्क नेते बाळा कदम, आमदार अॅड गौतम चाबुकस्वार, जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे, युवासेनेचे समन्वयक जितेंद्र ननावरे, शहरप्रमुख योगेश बाबर, शहरसंघटिका उर्मिला काळभोर, विधानसभा प्रमुख प्रमोद कुटे, विधानसभा संघटिका सरीता साने, अनिता तुतारे व शिवसेना पदाधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, प्रत्येक गटप्रमुख, शाखाप्रमुख यांनी उद्यापासून यादीवर काम करून घरोघरी प्रचार पत्रके, अहवाल, स्लीपा पोहचविण्याचे नियोजन करावे. पुढील दहा दिवस अहोरात्र शिवसैनिकांनी परिश्रम घ्यावे. मी देखील जास्तीत जास्त वेळ प्रचारासाठी देणार असल्याचे सांगितले. पिंपरी-चिंचवड, भोसरी व मावळ विधानसभा क्षेत्रातील महायुतीच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मताने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जिल्हाप्रमुख गजानन चिंचवडे म्हणाले की, नुकत्याच पार पाडलेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसैनिकांच्या प्रचाराची रंगीत तालिम झाली आहे. विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, गटप्रमुख यांनी यादीनिहाय अभ्यास करून प्रत्येक मतदारांच्या घरोघरी जावे. अॅड. गौतम चाबुकस्वार यांनी मनोगत व्यक्त करताना मागील पाच वर्षाच्या काळात केलेल्या कामाच्या जोरावर व संपर्कावर आपलाच विजय होणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

पुणे जिल्हा संपर्क नेते बाळा कदम म्हणाले की, जिल्हाप्रमुख, शहरप्रमुख, शहरसंघटिका व त्यांच्या सर्व शिवसैनिकांच्या टीमचे लोकसभेतील नियोजनबद्ध प्रचार कार्याबद्दल अभिनंदन केले. पुणे शहर व पिंपरी, चिंचवड या शेजारील मतदार संघात शिवसेनेकडे पिंपरी हा एकमेव मतदार संघ आहे. त्यामुळे शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी विशेष लक्ष केंद्रित करून काम करणे गरजेचे आहे, असेही त्यांना म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button