breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळा परिसरात पावसाच्या दमदार हजेरीने धबधबे वाहू लागले

पुणे – लोणावळा परिसरात मान्सूनने  शुक्रवारी (दि.28) जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. शहरातील अनेक रस्त्यावर  पाणी साचले, संततधार पावसाने डोंगरभागातून धबधबे वाहू लागले असून पर्यटकांनी पावसात भिजण्याचा मनमुराद आनंद लुटला.

लोणावळा शहरात पावसाने महिनाभरापासून कानाडोळा केला होता. पावसाअभावी पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरविली होती. गुरुवारी सायंकाळी पावसाने लोणावळा शहरात हजेरी ल‍ावली. पावसाची ही संततधार आज शुक्रवारी दिवसभर कायम राहिल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.

सहारा पुलासमोर डोंगरातून वाहणारे धबधबे दुपारपासून वाहू लागल्याने ती पर्यटकांकरिता पर्वणी ठरली होती. या धबधब्यांमध्ये बसून भिजण्याचा पर्यटक‍ांनी मनमुराद आनंद घेतला. पावसाची संततधार दिवसभर कायम होती.

पावसामुळे शहरातील मावळा पुतळा चौक, र‍ायवुड येथिल ट्रायोज मॉल समोरील रस्ता, नगरपरिषद रुग्णालयासमोरील रस्ता, भांगरवाडी, नांगरगाव, तुंगार्ली, वलवण गावातून जाणारा रस्ता तसेच मुंबई – पुणे द्रुतगती महामार्गाला जोडणारा वलवण पुलाखालील रस्ता, लोणावळा धरणाच्या खालील रस्ता हे सर्व ड्रेनेज सिस्टिम अभावी पाण्याखाली गेले होते. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास भांगरवाडी येथिल कर्नाळा बँकेसमोर एक गुलमोहराचे झाड कोलमडून रस्त्यावर पडल्याने काही काळ वाहतुक विस्कळीत झाली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button