breaking-newsपुणे

राष्ट्रवादीला ‘सोन्याची’झळाळी ; पुण्याचे गोल्डमॅन हातात बांधणार घड्याळ

पुणे |महाईन्यूज|

भाजप नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत पुण्यातील गोल्डमॅन प्रशांत सपकाळ हे सुद्धा आज (ता.२३) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी आपला कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नसल्याचा दावा सपकाळ यांनी केला आहे. सपकाळ यांचे संपूर्ण महाराष्ट्रात मोठे फॅन फॉलोअर्स आहेत. त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल असही सपकाळ यांच म्हणणं आहे.

एकनाथ खडसे हे शुक्रवारी दुपारी दोन वाजता शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांनी आपल्यासोबत भाजपचे 15 ते 16 आमदार असल्याचा दावा केला असला, तरी ते सध्या आपल्या जिल्ह्यातील मोजक्या समर्थकांसह राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणार आहेत. या सोहळ्यासाठी राष्ट्रवादी भवनात जय्यत तयारी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button