breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोगस शिक्षक भरती : अटक वॉरंट निघताच पालिका शिक्षण अधिकारी ज्योत्स्ना शिंदे फरार

  • अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला
  • घोटाळ्यातील 28 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू

पिंपरी / महाईन्यूज

शिक्षक भरती घोटाळ्यातील सहभागी मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट आणि सर्व अधिकारी, संस्था चालक आणि शिक्षक यांचे जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी फेटाळून लावले. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश मे. नावंदर कोर्ट यांनी हा निकाल दिला आहे. सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी बाजू मांडली. आर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. शिवाजी पवार, सहाय्यक पोलीस आयुक्त, आर्थिक गुन्हे शाखा व त्यांची टीम यांनी तपास करून बोगस शिक्षक भरतीचा खरा कारनामा समोर आणला आहे.

खोट्या व बनावट कागदपत्रांच्या आधारे कामावर नसलेल्या शिक्षकांना नियुक्त्या दिल्याचे भासवून आणि त्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे शिक्षण खात्यातील अधिकारी यांच्या संगनमताने मान्यता घेऊन शासनाची आर्थिक नुकसान केलेप्रकरणी या शिक्षक भरती घोटाळ्यातील अधिकारी, संस्था चालक व शिक्षक यांचे विरुध्द ऑक्टोबर २०१९ मध्ये जिल्हा परिषदेच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेशान्वये किसन दत्तोबा भुजबळ, विस्तार अधिकारी (शिक्षण), शिक्षण विभाग  प्राथमिक, जिल्हा परिषद, पुणे यांनी  भारतीय दंड विधान कलम १२०(ब), १०९, १८६, २०१, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, सह ३४ व भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्याचे कलम  १३(१) (क), १३(१)(ड) व १३(२) अन्वये बंडगार्डन पोलीस स्टेशन पुणे येथे फिर्याद दिली होती. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने ह्या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर यांचेकडे सोपविण्यात आला होता. या गुन्ह्यातील आरोपींनी अत्यंत हुशारीने आणि कौशल्यपूर्ण रीतीने शासनाचा पगार घेऊन शासनालाच फसविल्याचे दिसून आले.

  • या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी आणि त्यांनी केलेल्या गुन्ह्याची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे…..

१) रामचंद्र जाधव, तत्कालीन शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग पुणे व तत्कालीन शिक्षण प्रमुख, शिक्षण मंडळ, पुणे मनपा – खोट्या तुकड्यांचे आदेश बनावट खोटे जावक क्रमांक टाकून ते खरे वाटतील अशा रीतीने देऊन जागा निर्माण करण्यासाठी मदत करणे. पदावर नसतांनाही यांनी अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून खोट्या तुकड्या आणि शिक्षक मान्यता दिल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. )

२) श्रीमती मीनाक्षी राऊत, प्रशासकीय अधिकारी, पुणे मनपा व तत्कालीन प्र. शिक्षण उपसंचालक, पुणे विभाग, पुणे  –  मुख्य सूत्रधार आरोपी संभाजी शिरसाट यांचेशी संगनमत करून खोट्या नियुक्त केलेल्या शिक्षकांना शाळेत हजर करून घेणे, संस्थेवर दबाव टाकणे, खोट्या मान्यता देणे आणि खोटे बनावट शिक्षक आहेत हे माहित असतांना अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून त्यांना शालार्थ आय डी देऊन त्यांचा पगार सुरु करून देणे व शासनाला आर्थिक नुकसानीत टाकणे.

३) मुश्ताक शेख, तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.पुणे –   मुख्य सूत्रधार आरोपी संभाजी शिरसाट यांचेशी संगनमत करून खोट्या नियुक्त केलेल्या शिक्षकांना शाळेत हजर करून घेणे, संस्थेवर दबाव टाकणे, खोट्या मान्यता देणे आणि खोटे बनावट शिक्षक आहेत हे माहित असतांना त्यांना शालार्थ आय डी देऊन त्यांचा पगार सुरु करून देणे व शासनाला आर्थिक नुकसानीत टाकणे. अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करणे.

४) दत्तात्रय शेंडकर, तत्कालीन शिक्षणाधिकारी प्राथमिक, जि.प.पुणे – अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करून मोठ्या प्रमाणात तुकड्याचे आदेश कडून शिक्षक मान्यता देणे. बनावट शिक्षकंना शिक्षक मान्यता देणे व शासनास आर्थिक नुकसानीत टाकणे अधिकाराचा व पदाचा दुरुपयोग करणे.

५) ज्योस्त्ना शिंदे, प्रशासन अधिकारी, पिंपरी चिंचवड मनपा – मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट यांचेशी संगनमत करून खोट्या व बनावट शिक्षकांना मान्यता देणे , गुन्हा दाखल झाल्यानंतरही मान्यता देण्यात आल्या. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर  या गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे नष्ट करण्यासाठी पुन्हा फेर मान्यता देणे

६) संभाजी शिरसाठ, मुख्याध्यापक, तथा शिक्षक नेता – या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार असून शिक्षण खात्यातील अधिकाऱ्यांची संगनमत करून अर्थ प्राप्तीचा उद्योग म्हणून संस्थेच्या आणि अधिकारी यांच्या संगनमताने बनावट शिक्षक भरती करणे, त्यांचे खोटे बनावट नोकरीचे आदेश तयार करणे, बनावट शिक्षक मान्यता तयार करणे, शिक्षक कामावर नसतांना त्यांना हजर करून घ्यायला लावणे, त्यांचे मागील मस्टर तयार करून घेणे, अधिकारी यांच्याशी संगनमत करून शिक्षक वैयक्तिक मान्यता मिळवणे, त्यांची अनुदानित पदावर बदली दाखवून शिक्षणाधिकारी यांचेशी संगनमत करून पगाराची मान्यता मिळवणे आणि शालार्थ मध्ये नाव समाविष्ट करून पगार सुरु करून देणे. अशा गैर कामासाठी मोठ्या प्रमाणात रक्कम घेतल्याचे आढळून आले आहे. पोलिसांनी यांचे घरी  आणि नातेवाईकांचे घरी टाकलेल्या छाप्यात शिक्षण विभागाचे बनावट शिक्के मोठ्या प्रमाणात मिळून आले असून खोट्या मान्यता तयार करून असे अनेक शिक्षक नोकरीला लावल्याचे आढळून आले आहे.

७) गोविंदराव दाभाडे, संस्थापक अध्यक्ष नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डीव सर्व संचालक मंडळ, नवनगर शिक्षण मंडळ, आकुर्डी  –  हे तत्कालीन संस्था सचिव असून त्यांनी या संस्थेच्या अंतर्गत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणात मुख्य सूत्रधार संभाजी शिरसाट यांच्याशी संगनमत करून संस्थेमध्ये बोगस शिक्षक नियुक्त्या केल्या आणि शासनाला कोट्यावधी रुपयांना फसविले आहे.

  • या गुह्यातील अन्य आरोपी आणि बावट शिक्षक खालील प्रमाणे आहेत

८) परिमल गोविंदराव दाभाडे, विद्यमान अध्यक्ष नवनगर शिक्षण मंडळ

९) अश्विनी परिमल दाभाडे, सचिव, नवनगर शिक्षण मंडळ

१०) दत्तात्रय कुंजीर, मुख्याध्यापक, सरस्वती प्राथमिक विद्यामंदिर उरुळीकांचन, ता. हवेली, जिल्हा पुणे

११) अर्जुन (संभाजी सिरसाठ यांचा माणूस)

१२) मारुती हरिभाऊ नरसाळे, बनावट शिक्षक, प्रेरणा प्राथमिक धनकवडी

१३) शुभांगिनी श्रीरंग फुले, बनावट शिक्षिका,प्रेरणा प्राथमिक धनकवडी

१४) जयश्री आनंद काळे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

१५) अश्विनी अहिरराव सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

१६) मंगेश अहिरे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

१७) प्रियांका वालकोळी सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

१८)  रोहिणी अहिरे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

१९) भारती सोनवणे सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२०) जालिंदर सातव सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२१)  सीमा खेडेकर सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२२) एस एल वालकोळी, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२३) के. आर. महाडिक, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२४) अविनाश आखाडे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२५) नरखडे जयपाल, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२६) अमृत नवल पाटील, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२७) योगेश पाटील, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

२८) सचिन अशोक बिब्बे, सरस्वती प्राथमिक विद्यालय, उरुळीकांचन

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button