breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांच्या ‘टॅगलाईन’चा सोशल मीडियावर ‘धुमाकूळ’

  • उमेदवार पार्थ यांना तरुणांचा मिळतोय उदंड प्रतिसाद
  • मोदींकडून फसवणूक झाल्याने व्यक्त होतेय नाराजी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार पार्थ अजित पवार यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. “व्होट फॉर ट्रू व्हिजन, व्होट फॉर नेशन” अशी टॅगलाईन देऊन व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राला मुजरा घातला आहे. ही ‘टॅगलाईन’ ‘सोशल मीडिया’वर प्रभावशाली ठरत आहे.

  • लोकसभा निवडणुकीला अवघा 30 दिवसांचा अवधी राहिल्याने पार्थ पवार यांनी मावळ मतदार संघातील प्रत्येक गावातील नागरिकांच्या भेटी घेण्याचे नियोजन केले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करत ते तरुणांशी संवाद साधत आहेत. त्यांना भेडसावणारे प्रश्न जाणून घेण्यासाठी त्यांनी विद्यार्थी, तरुण, युवती, ज्येष्ठ नागरिक, महिलांशी प्रत्यक्ष संवाद साधला आहे. तरुणांमध्ये सोशल माध्यमांचे फॅड असल्याने पवार यांनी या माध्यमांतून सुध्दा तरुणांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे.

नुकताच त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. “व्होट फॉर ट्रू व्हिजन, व्होट फॉर नेशन” अशा टॅगलाईन देऊन शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांना मानाचा मुजरा घातला आहे.

  • विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक इन इंडिया, जनधन योजना, आवास योजना, उज्ज्वला योजना, दोन कोटी तरुणांना नोकरी, शेतक-यांची कर्जमाफी अशा सवलती देण्याचे आश्वासन नागरिकांना निवडणुकीपूर्वी दिले होते. यातील एकाही आश्वासनांची पूर्तता झाली नसल्यामुळे देशातील तरुणाईमध्ये मोदी विषयी नाराजी निर्माण झाली आहे. त्यातच आता लोकसभा निवडणुकीसाठी देखील भाजपकडून मोदींसाठी मते मागितली जात आहेत. तरुणांचा विश्वासघात केल्यामुळे तरुणांनी मोदींना मते देण्यासाठी उघडपणे नकार दर्शविला आहे.

मोदींविषयी झालेली नाराजी पाहून राष्ट्रवादीचे उच्चशिक्षीत उमेदवार पार्थ पवार यांनी या व्हिडिओमध्ये “व्हॉट फॉर नेशन”, ही टॅगलाईन दिली आहे. मोदींवर तरुणांची नाराजी दिसत असताना भाजपकडून पुन्हा मोदी फॅक्टरच चालवला जात आहे. परंतु, पार्थ पवार यांनी मात्र, देशासाठीची टॅगलाईन चालविली आहे. शिवाय, “व्होट फॉर ट्रू व्हिजन” असेही पार्थ पवार म्हणतात, यावरून पंतप्रधान मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचे व्हिजन नव्हते, म्हणूनच लोकांची फसवणूक झाली असेच पवार यांना म्हणायचे असेल. त्यामुळे त्यांनी पुन्हा तरुणांना “व्होट फॉर ट्रू व्हिजन” अशी साद घातली असावी, असा तर्क राजकीय जाणकारांनी काढला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button